Tue, Jun 18, 2019 11:20होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : चिखलठाणा एमआयडीसीमध्ये मनपा गोडाऊनला भीषण आग 

औरंगाबाद : चिखलठाणा एमआयडीसीमध्ये मनपा गोडाऊनला भीषण आग 

Published On: May 19 2019 3:16PM | Last Updated: May 19 2019 4:38PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबादमधील चिखलठाणा येथील महानगर पालिकेच्या गोडाऊनला आज (ता.१९) भीषण आग लागली. या आगीमध्ये महानगर पालिकेचे विद्‍युत साहित्‍य जळून खाक झाले. 

चिखलठाणा एमआयडीसीतील महानगर पालिकेच्या गोडाऊनला आज सकाळी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्‍निशामक दलाचे चार बंब आणि इतर खासगी पाण्याच्या बंबांनी ही आग आटोक्‍यात आणली. या घटनेत कोणत्‍याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्‍याची माहिती मिळत आहे. मात्र या भीषण आगीत यामध्ये महानगरपालिकेचे सर्व विद्‍युत साहित्‍य जळून खाक झाले असून, मोठे नुकसान झाल्‍याची शक्‍यता आहे. मात्र अजूनही नुकसानीची माहिती नाही.