Sat, Aug 24, 2019 10:36होमपेज › Aurangabad › जात प्रमाणपत्रासाठी भिल समाजाचे बेमुदत उपोषण..

जात प्रमाणपत्रासाठी भिल समाजाचे बेमुदत उपोषण..

Published On: Nov 12 2018 5:47PM | Last Updated: Nov 12 2018 5:47PMसिल्लोड (औरंगाबाद) :  प्रतिनिधी 

सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून भिल समाजाच्या लोकांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत भील समाजाजाच्या वतीने पारंपरिक वेशभूषा व नृत्यांच्या सादरीकरणासह बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. 

उपविभागीय अधिकारी कार्यालयात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले आदिवासी भिल जातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे व रद्द करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र संचिकेची पुनर्विलोकन करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेतर्फे महिलांसह पारंपरिक वेशभूषा करीत उपविभागीय कार्यालयाच्या समोर दि.१२ सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले आहे. 

आदिवासी भिल जमातीचे प्रमाणपत्र आम्हाला जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात उपोषणकर्त्यांनी दिला आहे. निवेदनावर संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दिलीप बर्डे, जिल्हाध्यक्ष शिवाजी शेळके, जिल्हाउपाध्यक्ष विजय सुरासे, दिपक बागुल, आनंदा बहिरम, अंकुशराव पवार, अशोकराव सोनवणे, सीताराम सोनवणे, विक्रम काळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या उपोषणाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, एमआयएम, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांनी पाठिंबा दर्शविला.