Sat, Jul 04, 2020 16:31होमपेज › Aurangabad › औंरगाबादमध्ये बाधितांचा आकडा दीड हजाराच्या उंबरठ्यावर

औंरगाबादमध्ये बाधितांचा आकडा दीड हजाराच्या उंबरठ्यावर

Last Updated: May 30 2020 8:45AM

संग्रहित छायाचित्रऔंरगाबाद : पुढारी वृत्तसेवा   

औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी २८ रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार ४८७ झाली आहे. यापैकी ९३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ६९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ४८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मला त्रास दिलात, तर सायनाईड खाऊन जीव देईन : हर्षवर्धन जाधवांची सासरे दानवेंना धमकी

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशिल पुढील प्रमाणे : 

जुना बाजार (२), मुझफ्फर नगर, हडको (१), व्यंकटेश नगर (१), सुराणा नगर (२), नारळी बाग (२), शिवशंकर कॉलनी (२), हमालवाडी (१), न्यु वस्ती जुनाबाजार (१), भवानी नगर, जुना मोंढा (५), मनजीत नगर, आकाशवाणी परिसर (१), शिवाजी नगर (१), उस्मानपुरा (४), रेहमानिया कॉलनी (१), रोशन गेट परिसर (२), नारेगाव परिसर (१), न्याय नगर (१) या भागातील रुग्ण आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिला रुग्णांचा समावेशी आहे.