होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत पोलिस ठाण्यासमोर आग लागून ४ वाहने खाक

औरंगाबादेत पोलिस ठाण्यासमोर आग लागून ४ वाहने खाक

Published On: Nov 14 2017 11:05AM | Last Updated: Nov 14 2017 11:05AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यासमोरील मोकळ्या मैदानात उभ्या चारचाकी वाहनांना आग लागून चार वाहने खाक झाली. मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली. 

अग्निशमन प्रमुख संपत भगत यांनी माहिती दिली की, जिन्सी भागात पोलिस ठाण्यासमोर मोकळ्या मैदानात वाहने उभी केली जातात. तेथेच कचरा आणि घाण साचलेली असते त्यामुळे आग लागली असावी. आगीत चारचाकी चार वाहने पेटल्यानंतर भगत व त्याचे पथक जिन्सी भागात पोचले व त्यानी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. आगीचे कारण स्पष्ट नसून या घटनेची नोंद जिन्सी पोलिस ठाण्यात करण्यात आली. 

ही आग लागली की लावली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, वाहने जाळणारे रॅकेट मागील काही वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. त्यातच ही घटना घडल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.