Wed, May 27, 2020 10:40होमपेज › Aurangabad › औरंगाबादला दिलासा! २४ रुग्णांना डिस्चार्ज

औरंगाबादला दिलासा! २४ रुग्णांना डिस्चार्ज

Last Updated: May 23 2020 8:50AM

संग्रहित छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. औरंगाबादमध्ये रुग्णांची वाढत आहेत. तसेच बरे होण्याचे प्रमाणही आहे. काल आरंगाबाद महापालिकेच्या कोव्हिड केअर सेंटर येथून आज २४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. 

वाचा : औरंगाबादेत आता 'डेडिकेटेड कोविड मॅटर्निटी'

यामध्ये रामनगर ५, पुंडलिकनगर ४, एन-८ सिडको १, प्रकाशनगर १, नारेगाव १, जुनाबाजार ४, हमालवाडी १, चिकलठाणा १, किलेअर्क १ व अन्य भागातील ५ अशा २४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर घाटी रुग्णालयातून भडकल गेट येथील १ व इंदिरा नगरातील १ अशा दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातून आज ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी दिवसभरात ३० रुग्ण बरे झाल्याने घरी परतले आहेत.

५९१ रुग्णांवर उपचार सुरू

घाटी, मिनी घाटी, आणि मनपाच्या कोव्हिड केअर सेंटर आणि खाजगी रुग्णालय मिळून सद्या ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात विशेष करुन घाटी रुग्णालयात प्रकृती गंभीर असलेल्या १३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. तर ६५ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

वाचा :औरंगाबाद : मृत्यूचे सत्र सुरूच! २ महिलांचा मृत्यू