Sat, Aug 24, 2019 10:18होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन

औरंगाबादमध्ये इंधन दरवाढी विरोधात तीव्र आंदोलन

Published On: Sep 10 2018 12:00PM | Last Updated: Sep 10 2018 12:00PMऔरंगाबाद: प्रतिनिधी

इंधन दरवाढीच्या विरोधात आणि महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे आज शहरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. शहरातील क्रांती चौक बाबा पेट्रोल पंप कॉर्नरवरील भवानी पेट्रोल पंप, मुकुंदवाडी हर्सूल पॉईंट आदी विविध ठिकाणी निदर्शने करून भाजप व शिवसेना सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनात शहरातील नेते आमदार खासदार माजी खासदार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज शहरातील विविध ठिकाणच्या आंदोलनात सहभाग नोंदवला त्यांच्यासोबत शहराध्यक्ष नामदेव पवार आमदार सुभाष झांबड माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी सहभागी झाले होते.

एपीआय कॉर्नर येथील भवानी पेट्रोल पंपावर काँग्रेस सेवादलतर्फे इसके आगे बिन बजाव असे अनोखे आंदोलन करण्यात आले तर क्रांती चौकातील हिंद पेट्रोल पंपावरील आंदोलनात कार्यकर्त्यांनी सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्याच्या चालीवर घोषणाबाजी करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. बाबा पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्यावतीने तर राज पेट्रोल पंपावर महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलने झाली.