होमपेज › Aurangabad › मुख्याध्यापकाकडून २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ

मुख्याध्यापकाकडून २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ 

Published On: Feb 07 2019 7:43PM | Last Updated: Feb 07 2019 7:56PM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

राज्याच्या शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा संतापजनक प्रकार औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. येथे एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने २१ विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याची घडना उघडकीस आली. यासंदर्भात सोयगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रार दाखल होताच मुख्याध्यापक फरार झाला आहे. 

मिळालेली माहिती अशी, औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक गेल्या आठवडाभरापासून शाळेतील सहावी ते आठवी या तीन वर्गातील विद्यार्थिनींबरोबर अश्लील भाषेत बोलत होता, ही बाब वाढत गेल्याने विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी सांगितला. संताप अनावर झाल्याने बुधवारी सकाळी पालकांनी शाळा गाठली. पालकांच्या आक्रमक पवित्र्याची माहिती मिळताच गटशिक्षण अधिकारी विजय दुतोंडे यांनी सोयगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. यावेळी २१ पीडित विद्यार्थीनींचा जबाब घेतल्यानंतर मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय गटशिक्षण अधिकारी यांनी घेतला आहे.