Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Aurangabad › नगर : ऊस दराबाबत शेतकरी आक्रमक 

नगर : ऊस दराबाबत शेतकरी आक्रमक 

Published On: Nov 15 2017 1:13PM | Last Updated: Nov 15 2017 1:27PM

बुकमार्क करा

शेवगाव :  प्रतिनिधी

ऊस दरासाठी शेवगाव तालुक्यात घोटण येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज (बुधवार) पहाटे साडेपाच वाजता पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करून कार्यकत्यांना अटक केली. पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, शेतकऱ्यांनी हे अंदोलन चालूच ठेवले, यात ठिकठिकाणी रस्ते अडवून टायर पेटविण्यात आल्या. तर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याने खानापूर येथे सकाळी शेतकऱ्यांनी अचानक रस्तारोको अंदोलन सुरु केले. येथेही पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काही एस.टी. बसच्या टायरची हवा सोडली. 

खानापूर येथील अंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलीसांनी लाठीचार्ज केला तसेच अश्रूधुरांच्या नळकांडयाही फोडल्या. पोलिसांनी  हवेत गोळीबार केला. यात दोन शेतकरी जखमी झाले. गोळीबारानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली, यात काही पोलीस जखमी झाले आहेत.