Mon, Sep 16, 2019 11:46होमपेज › Aurangabad › ...अन् रोहीचे प्राण वाचले

...अन् रोहीचे प्राण वाचले

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:05PMवसमत : प्रतिनिधी

उन्हाळ्याची चाहूल लागताच मानवासह वन्य प्राणीही पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र भटकंती होते. असाच काहीसा प्रकार वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारात घडला आहे. पाण्याच्या शोधार्थ आलेली रोही विहिर पडल्याची घटना शुक्रवारी दि.16 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. विहिरीत पाणी कमी असल्याने रोहीस बाहेर निघता न आल्यामुळे शनिवारी दि.17 रोजी वनविभागाहस ग्रामस्थांनी शर्थीचे मोठे प्रयत्न करून प्राण वाचविले. जंगलातील वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ सैरवैर होत आहे. या संदर्भात वनविभागाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

तालुक्यातील पांगरा शिंदे शिवारातील शेतकरी तुकाराम शिंदे यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारी दि.16 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ आलेला वन्यप्राणी रोही पडला. सदरील विहिरीत पाणी कमी असल्याने या घटनेची माहिती शनिवारी दि.17 फेब्रुवारी रोजी शेतकर्‍यास मिळाल्याने त्यांनी ही माहिती तात्काळ वनविभागास दिली. त्यानंतर वनविभागाचे वनपाल महेश रुमाले, वनरक्षक जी.यादव यांनी घटनास्थळावर धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करीत विहिरीत पडलेल्या रोहीस बाहेर काढुन त्याचे प्राण वाचविले.उन्हाळ्याच्या सुरुवातीस जंगलात वन्य प्राण्यास पाणी मिळत नसल्याने प्राणी पाण्याच्या शोधार्थ भटकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या प्रकाराकडे वनविभागाने लक्ष देऊन जंगलात पाणवटे उभारण्याची मागणी होत आहे.