Tue, Oct 22, 2019 14:01होमपेज › Aurangabad › नाथसागर धरणात पाण्याची जोरदार आवक

नाथसागर धरणात पाण्याची जोरदार आवक

Published On: Sep 11 2019 7:39PM | Last Updated: Sep 11 2019 7:19PM
पैठण : प्रतिनिधी 

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सध्या जायकवाडी धरणात 34 हजार 939 क्युसेस वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. ही आवक सकाळी 12 वाजेपर्यंत 46 हजारने सुरू होती, त्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या वेगाने वाढली असल्याची माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक, नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे नगर, नाशिक जिल्ह्यातील नगमठाण वेअरमधून 34 हजार क्युसेस वेगाने पाणी जायकवाडी धरणात दाखल होत आहे. आज सकाळी मात्र 46 हजारने जोरदार आवक सुरू होती. सायंकाळी सात वाजेपर्यंत धरणाची पाणी पातळी 463.467 मीटर आहे.

सध्या नाथसागर धरणात नांदूरमधमेश्वर 6087 क्यूसेक, नागमठान 20,240 भंडारदरा 2032, निळवंडे, मुळा 7988, ओझरवेअर 7988,  भावली 481, वालदेवी 1050, दारणा 5120, गंगापूर 1713, कडवा1272, आळंद 243, वाघड 806, आदी बंधाऱ्यातून जायकवाडीच्या जलाशयात पाणी येत असून, रात्री पाण्याची आवक कमी होण्याची शक्यता धरण अभियंता चव्हाण यांनी व्यक्त केली. सध्या उजव्या कालव्यात 900 क्यूसेस तर, डाव्या कालव्यात 125 क्यूसेस असे पाणी सोडण्यात आलेले  आहे.