होमपेज › Aurangabad › तिसऱ्या युनिसेफ रेडिओ फॉर चाईल्ड पुरस्कारात औरंगाबाद आकाशवाणीचे प्राबल्य

तिसऱ्या युनिसेफ रेडिओ फॉर चाईल्ड पुरस्कारात औरंगाबाद आकाशवाणीचे प्राबल्य

Published On: May 15 2019 1:33PM | Last Updated: May 15 2019 1:15PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

तिसऱ्या युनिसेफ रेडिओ फॉर चाईल्ड पुरस्‍कारासाठी यंदा औरंगाबाद आकाशवाणीला ३ पुरस्‍कार मिळाले. युनिसेफ दूत अभिनेत्री करीना कपूर खानच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

औरंगबादचे कार्यक्रम अधिकारी उन्मेष वाळिंबे, नम्रता फलके, लायब्ररीयन शिवाजी काथवटे आणि निवेदक नितीन देशपांडे यांनी रुबेला लसीकरण आणि बालकांचे शोषण यावर स्पॉट, प्रोमो, जिंगल तयार करून पाठवले होते. या अंतर्गत देशभरातून 152 प्रवेशिका आल्या होत्या. आकाशवाणी औरंगाबादच्या उन्मेष वाळिंबे, नम्रता फलके आणि शिवाजी काठवते यांना वेगवेगळ्या विभागामध्ये हे पुरस्कार मिळाले.

यंदाच्या पुरस्कारांमध्ये आकाशवाणी औरंगाबादचे प्राबल्य राहिले. नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या ऑडिटोरिम मध्ये हा सोहळा पार पडला.अभियंता संदीप अहिरराव, मोहम्मद रफिक, शिझा शेख, शाहीर अजिंक्य लिंगायत, विश्वनाथ दाश्रथे आणि मिलन नायगडे यांचा यामध्ये आवाज वापरण्यात आला होता. एकाच वेळी 3 पुरस्कार जिंकणारे आकाशवाणी औरंगाबाद हे देशातील एकमेव केंद्र ठरले आहे.