Wed, Jun 26, 2019 15:15होमपेज › Aurangabad › कारागृह अधीक्षकांचेच घर पैठणमध्ये फोडले 

कारागृह अधीक्षकांचेच घर पैठणमध्ये फोडले 

Published On: Aug 14 2018 1:09AM | Last Updated: Aug 14 2018 1:02AMपैठण : प्रतिनिधी  

येथील खुले जिल्हा कारागृह अधीक्षक सचिन रमेश साळवे यांचे घर फोडून चोरट्यांनी 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील जयभवानीनगर येथे रविवारी रात्री घडली.

पोेलिसांच्या माहितीनुसार साळवे हे शहरातील जयभवानी नगर येथील कृपाल हाईटस् या फ्लॅटमध्ये तीन वर्षांपासून राहतात. शनिवार व रविवार सुटी असल्याने ते आपल्या कुटुंबासह बहिणीला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. 

घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रविवारी रात्री त्यांच्या घराचा दरवाजाचा कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटात ठेवलेले 85 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, या घटनेची माहिती शेजारी स्वागत क्षीरसागर यांनी त्यांना मोबाइलवर दिली. त्यानंतर साळवे यांनी पैठण गाठले. याप्रकरणी साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुयद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.