Mon, Jun 17, 2019 10:40होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये कच-याला लागली आग 

औरंगाबादमध्ये कच-याला लागली आग 

Published On: Oct 12 2018 2:06PM | Last Updated: Oct 12 2018 2:08PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबादमधील पैठणगेट येथे मागील अनेक दिवसांपासून पडलेल्या कच-याला आज सकाळी साडे अकरा वाजता आग लागली. परिसरातील दुकानदाराने माहिती दिल्याने मनपा अग्निशमन दलाच्या बंबाने धाव घेवून ही आग विझवली.

या शहराची कचराकोंडी झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून कचरा पेटविण्याचे प्रकार अद्यापही थांबलेले नाहीत. पुन्हा सकाळी साडे अकरा वाजता पैठणगेट परिसरातील मनपाच्या वाहन तळालगत पडलेला कचरा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला. गेल्या अनेक दिवसांपासून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलेल्या कच-याने काही मिनिटांतच पेट घेतला.

दुस-या घटनेत शहागंज भाजीमंडई येथेही अकरा वाजण्याच्या सुमारास कच-याला आग लागली होती. याठिकाणी ही  धाव घेवून अग्निशमनच्या जवानांनी आग विझवली.