होमपेज › Aurangabad › शहागंजमधील ‘त्या’ शंभर टपर्‍या हटविण्याचा मनपाचा निर्णय

शहागंजमधील ‘त्या’ शंभर टपर्‍या हटविण्याचा मनपाचा निर्णय

Published On: Apr 25 2018 2:02AM | Last Updated: Apr 25 2018 12:01AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

लीजची मुदत संपल्याने महानगरपालिकेने आता शहागंज येथील ऐतिहासीक घड्याळाच्या बाजूच्या शंभर टपर्‍या हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहागंज चौकाचा श्‍वास लवकरच मोकळा होणार आहे. याशिवाय शहागंज, सिटी चौक, रंगारगल्ली, चेलीपुरा आदी ठिकाणच्या रस्त्यांवरील हातगाड्यांविरोधातही मोहीम राबविण्याचे आदेशही महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी मनपात झालेल्या बैठकीत प्रशासनाला दिले.

नगरपरिषदेच्या काळात शहागंज चौकात छोट्या व्यापार्‍यांना 4 बाय 6 फूट आकाराचे लोखंडी टपर्‍यांचे शंभर गाळे लीजवर देण्यात आलेे होते. त्यांची मुदत कधीच संपलेली आहे. दुसरीकडे या गाळेधारकांनी आजूबाजूचा परिसरही व्यापला आहे. त्यामुळे या ठिकाणी चालणेही कठीण झाले आहे. 9 मीटर आणि 45 मीटर रस्त्यातील अतिक्रमणे तत्काळ हटवावीत, असे न्यायालयाचेही आदेश आहेत. त्यानुसार मनपाने आता या शंभर टपर्‍या हटविण्याचा निर्णय घेतला आहे. 

कारवाईवरून शहागंजमध्ये तणाव

अतिक्रमण पथक मंगळवारी सायंकाळी हातगाड्या आणि दुकानांसमोरील अतिक्रमण हटविण्यासाठी शहागंज भागात पोहचले.  या पथकाने दुकानदारांना समोरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन केले. तसेच आजूबाजूच्या हातगाड्या उचलण्यास सुरुवात केली, परंतु थोड्याच वेळात तिथे मोठ्या प्रमाणावर जमाव तयार झाला. या जमावाने कारवाईला तीव्र विरोध केला. पालिकेच्या अधिकार्‍यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी या जमावाने मनपाच्या कर्मचार्‍यांनी जप्‍त करून ट्रकमध्ये टाकलेल्या हातगाड्या उतरून घेतल्या. 

Tags : Aurangabad,  decision, corporation,  remove,  hundred, ,illegal, shops,  Shahganj