Wed, Oct 24, 2018 02:24होमपेज › Aurangabad › वडोदबाजारजवळ मृतदेह आढळला

वडोदबाजारजवळ मृतदेह आढळला

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 2:01AM

बुकमार्क करा

आळंद ः प्रतिनिधी

औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोद बाजारजवळ 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास आढळून आला आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून भावकीतील लोकांसोबत माझ्या वडिलांचा जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे त्यांचा शेतीच्या वादातून खून झाल्याचा संशय मृताच्या मुलाने व्यक्‍त केला आहे. किसन सांडू मिरगे (55, रा. मालखेडा, ता. भोकरदन) असे मृताचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोद बाजार गावाकडे जाणार्‍या रस्त्याच्या कडेला एका व्यक्‍तीचा मृतदेह असल्याची माहिती वडोद बाजार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता या व्यक्‍तीच्या अंगावर व डोक्यावर मारहाणीच्या खुणा तसेच डोक्याचे रक्‍त गोठलेल्या अवस्थेत आढळून आले. दरम्यान, या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मृत मिरगे यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. मिरगे यांचा भावकीतील काही लोकांशी शेेतजमिनीवरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयीन प्रविष्ट आहे. त्यामुळे जमिनीच्या वादातूनच माझ्या वडिलांचा  खून झाल्याचा संशय मृताच मुलगा मुकुंदा मिरगे यांनी व्यक्‍त केला आहे. 

मिरगे यांचा मृतदेह महात्मा फुले रुग्णवाहिकेतून चालक विजय देवमाळी यांनी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. त्यानंतर तेथे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी वडोदबाजार पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मृताचा मुलगा मुकुंद मिरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास मिरगे यांना काळे कोट परिधान केलेले काही लोक बळजबरीने दुचाकीवर बसवून घेऊन जात होते. यावेळी त्यांच्यात झटापटही झाली, अशी मिळताच मृताच्या नातेवाइकांनी त्यांचा परिसरात बराच शोध घेतला, मात्र ते आढळून आले नाही.