Mon, Sep 16, 2019 05:30होमपेज › Aurangabad › मुलाला ठार मारण्याची  धमकी देऊन बलात्कार

मुलाला ठार मारण्याची  धमकी देऊन बलात्कार

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:38AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मुलाची बॅग आणण्यासाठी जात असलेल्या महिलेस बळजबरी बसने मेहकर येथे नेऊन मुलास मारण्याची धमकी देत बलात्कार करणार्‍या नराधमाविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निसार असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारी 21 वर्षीय महिला गल्लीतच राहणार्‍या निसारच्या वडिलांच्या किराणा दुकानावर सामान आणण्यासाठी जात असल्याने त्याच्याशी ओळख झाली होती. 27 जून रोजी पीडित महिला चार वाजेच्या सुमारास रिक्षात बसून मुलासाठी शाळेची बॅग आणण्यासाठी जात होती. या वेळी निसारने महिलेची रिक्षा थांबवून तिला खाली उतरविले. त्यानंतर तिला व मुलाला बळजबरी सिडको बसस्थानकावरून मेहकर येथे घेऊन गेला. तेथे बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका लॉजवर नेऊन मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केला. याप्रकरणी महिलेने त्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक क्रांती निर्मळ  तपास करत आहेत.