Mon, Sep 16, 2019 12:12होमपेज › Aurangabad › सेवानिवृत्त वन अधिकार्‍याला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा

सेवानिवृत्त वन अधिकार्‍याला सव्वा लाखाचा ऑनलाइन गंडा

Published On: Dec 23 2017 2:02AM | Last Updated: Dec 23 2017 1:38AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

ऑनलाइन भामट्याने सेवानिवृत्त वन अधिकार्‍याला तब्बल एक लाख 35 हजार रुपयांचा गंडा घातला. ही घटना न्यू हनुमाननगर भागात 18 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी 22 डिसेंबर रोजी पुंडलिकनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. 

याबाबत पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज यांनी सांगितले की, सांडू तोताराम फुसे (59, रा. न्यू हनुमाननगर, ग.नं. 1, गारखेडा परिसर) हे वन विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते 18 डिसेंबर रोजी घरी बसलेले असताना एका भामट्याने त्यांना फोन केला. त्याने एटीएम कार्ड अपडेट करण्याचे आमिष दाखवून फुसे यांच्याकडून एटीएमवरील सोळा अंकी क्रमांक घेतला.

त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक मिळवून भामट्याने एक लाख 35 हजार रुपये लंपास केले. 22 डिसेंबर रोजी फुसे यांनी बँकेत जाऊन पासबुक अपडेट केल्यानंतर पैसे गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.