Wed, Feb 26, 2020 19:34होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पैशाच्या वादातून एकाला पेटवले

औरंगाबाद : पैशाच्या वादातून एकाला पेटवले

Last Updated: Jan 23 2020 6:03PM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

प्लॉटच्या पैशाच्या वादातून एकाला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना समोर आली. ही घटना जय भवानी नगर, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रस्त्यावर आज दुपारी अडीच वाजता घडली. यात शेषराव दगडू शेंगुळे (वय 54, रा. जयभावानी नगर) हे 65 टक्के भाजले आहेत. 

अधिक वाचा : 'प्रगतीशील महाराष्ट्रात विरोधी पक्ष आंधळा नसावा'

या विषयी अधिक माहिती अशी की, शेंगुळे यांचे विश्रांती नगर चौक, जय भवानी नगर येथे श्री साई इंटरप्राइजेस नावाने दुकान आहे. या दुकानात शेंगुळे असताना सूर्यवंशी जाधव, स्वाती जाधव, गजानन जाधव दीपक जाधव हे त्‍या ठिकाणी आले. त्यांनी पैशाच्या कारणावरून शेंगुळे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्‍यांना पेटवून दिले. या प्रकारानंतर जखमी शेंगुळे यांना तात्‍काळ उपचाराकरिता घाटी हॉस्पिटला नेण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी भेट दिली.