Tue, Jul 07, 2020 20:15होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : अंधारीत बाजार समितीच्यावतीने चारा छावणी सुरु 

औरंगाबाद : अंधारीत बाजार समितीच्यावतीने चारा छावणी सुरु 

Published On: May 21 2019 6:47PM | Last Updated: May 21 2019 6:45PM
सिल्लोड : प्रतिनिधी  

राज्यात दुष्काळाने सर्वच गावे होरपळून निघाली आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्यांची मोठी समस्या जाणवत आहे. यावर उपाय म्हणून सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे बाजार समितीच्यावतीने चारा छावणी सुरु करण्यात आली आहे. या चारा छावणीचे उद्घाटन माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. 

ज्या शेतक-यांना आपली जनावरे चारा छावणीमध्ये दाखल करावयाची आहेत. अशा शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था परिसरातील जवळच्या चारा छावणीत दाखल करून घ्यावी असे आवाहन आ. अब्दुल सत्तार यांनी केले. कागदपत्रांची पूर्तता केल्यावरच चारा छावणीमध्ये एका शेतक-याचे जास्तीत जास्त पाच जनावरे दाखल करता येणार आहेत.

अंधारी येथे बाजार समितीच्या या चारा छावणीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, गटनेते नंदकिशोर सहारे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुनिल पाटणी, लक्ष्मण गायकवाड, भिमराव काळे, संजय गौर, हरिदास दिवटे, रघुनाथ मोरे, शंकरराव फुले, अनुसयाबाई मोरे, रामु मिरगे, नरसिंगराव चव्हाण, दामुआण्णा गव्हाणे, अर्जुन गाढे, सतिश ताठे, इश्वर जाधव, लिलाबाई मिसाळ, लक्ष्मण तायडे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.