Tue, Jan 22, 2019 07:15होमपेज › Aurangabad › आ. अब्दुल सत्तार यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केली दिवाळी

आ. अब्दुल सत्तार यांनी आदिवासी समाजासोबत साजरी केली दिवाळी

Published On: Nov 08 2018 6:08PM | Last Updated: Nov 08 2018 6:08PMसिल्लोड : प्रतिनिधी   

दरवर्षीप्रमाणे आ.अब्दुल सत्तार यांनी यंदाच्याही दिवाळीचा आनंद आदिवासी समाजासोबत साजरा केला असून, शहरातील इंदिरानगर परिसरातील स्मशानजोगी, वैदू, वडार, घिसाडी व शिकलकर समाजाच्या बांधवांना दिवाळी निमित्त धान्य व साखरेची गोडभेट देत नागरिकांच्या विविध विकास कामांना सुरवात करून या भागांतील लोकांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. सिल्लोड शहरातील आदिवासी समाजातील विविध जातींचे वास्तव्य असलेल्या इंदिरा नगर परिसरातील यंदाच्या दिवाळीवर मोठ्या प्रमाणात दुष्काळाची गडद छाया दिसून येत होती. यंदाच्या दिवाळीला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जवळपास पूर्ण दिवस आदिवासी समाजातील लोकांसोबत आ. सत्तार यानी दिवाळीचा आनंद साजरा केला.

उपस्थित आदिवासी समाजाच्या भगिनींना त्यांनी आपल्या मुलां मुलींना शाळेत पाठविण्याचे आवाहन करीत आपले आरोग्य निरोगी राहावे म्हणून घर परिसरातील स्वच्छता ठेवण्याचा विशेष आग्रह केला. उपस्थितांना दिवाळीच्या निमित्ताने परिसरातील दोन पूल व अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ लगेच करून व परिसरात जून पासून शाळा सुरू करण्याचे आश्वासन देऊन दिवाळीची एक आगळीवेगळी भेट इंदिरानगरच्या नागरिकांना दिली. या वेळी त्यांचा सोबत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष देविदास लोखंडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक रऊफ बागवान,  शेख मोहसीन, विठ्ठल सपकाळ, रईस मुजावर, राजू गौर,  मोहमद इसाक, अमित आरके, सतीश ताठे, मनोज झवर, मतीन देशमुख, शेख बाबर, संजय आरके, राजू बागवान, सुनील दुधे, राजरत्न निकम,  कुणाल सहारे, सलीम हुसेन, संजय मुरकुटे, शांतीलाल अग्रवाल, मोहमद हनिफ, अकील देशमुख, मनोहर आरके, जगन्नाथ कुदळ, रवी आरके, ए एम पठाण, बारकू आरके, फहिम पठाण,  आदींची उपस्थिती होती.