Wed, Feb 26, 2020 18:20होमपेज › Aurangabad › कोरेगाव-भीमा प्रकरण : ४४ जणांना न्यायालयीन, तर चौघांना पोलिस कोठडी

कोरेगाव-भीमा प्रकरण : ४४ जणांना न्यायालयीन, तर चौघांना पोलिस कोठडी

Published On: Jan 05 2018 1:34AM | Last Updated: Jan 05 2018 1:10AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर शहरात झालेल्या दगडफेकीत आतापर्यंत अनेक गुन्हे नोंद झाले असून आतापर्यंत तब्बल 44 आरोपींची न्यायालयीन कोठडीत म्हणजेच हर्सूल कारागृहात, तर 4 आरोपींची पोलिस कोठडीमध्ये रवानगी करण्याचे आदेश न्यायालयाने गुरुवारी (दि. 4) दिले.

औरंगाबादेत गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या हिंसक घटनांमध्ये वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत दाखल गुन्ह्यातील एकूण 48 आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. याच प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यामध्ये आरोपी आकाश सुरेश रगडे (19), संदीप प्रभू कवडे (18), राजू पुंडलिक भिसे (28) आणि सचिन रतन वाहूळकर (26, सर्व रा. इंदिरानगर, गारखेडा) यांच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी साहेबराव नामदेव कांबळे यांनी फिर्याद दिली होती.

त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. गुरुवारी सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना शनिवारपर्यंत (6 जानेवारी) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. के. कुरुंदळे यांनी दिले. तसेच, इतर 44 आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. बुधवारीही 16 आरोपींना कोठडीत पाठविण्यात आले होते.