Sat, Jul 04, 2020 18:08होमपेज › Aurangabad › मला त्रास दिलात, तर सायनाईड खाऊन जीव देईन : आ. हर्षवर्धन जाधवांची सासरे दानवेंना धमकी

मला त्रास दिलात, तर सायनाईड खाऊन जीव देईन : आ. हर्षवर्धन जाधवांची सासरे दानवेंना धमकी

Last Updated: May 30 2020 1:40AM
औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा 

कन्नडचे माजी आ. हर्षवर्धन जाधव आणि त्यांचे सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील कौटुंबिक वाद पुन्हा चिघळला आहे. मी आता कोचिनला जात असून पोलिसांमार्फत त्रास दिल्यास मी सायनाईडच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करेन, अशी धमकी देणारा व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच राजकारणातून निवृत्ती जाहीर करून पत्नी संजना जाधव या आपल्या उत्तराधिकारी असतील, अशी घोषणा केली होती. यामुळे जाधव-दानवे कुटुंबीयांतील वाद मिटल्याचे दिसून आले. परंतु, जाधव यांनी शुक्रवारी नवीन व्हिडीओ व्हायरल केल्याने दोन्ही कुटुंबीयांत अलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संसार करू शकत नाही

तुम्ही मला कितीही त्रास दिला तरी आता मी संजना यांच्यासोबत संसार करू शकत नाही. माझा खून केला तरीही ते शक्य होणार नाही. संजना यांना घेऊन कन्नडचे राजकारण करा. त्यासाठी हवी ती  मदत मी करेन, असेही हर्षवर्धन जाधव यांनी व्हिडीओत म्हटले आहे. 

10 कोटींच्या प्लॉटसाठी...

‘तुमच्या मुलीला मी समर्थनगरातील बंगला देण्यास तयार आहे. परंतु, अदालत रोडवरील प्लॉट व पिशोर येथील शेती मात्र देणार नाही. तुम्ही 20 हजार कोटींचे मालक आहात; परंतु 10 कोटींचा प्लॉट तुम्हाला सुटत नाही’, अशी टीका जाधव यांनी केली आहे.