Mon, Jul 13, 2020 11:27होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : चार उमेदवारांचे अर्ज अवैध

औरंगाबाद : चार उमेदवारांचे अर्ज अवैध

Published On: Oct 05 2019 4:19PM | Last Updated: Oct 05 2019 4:19PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात आज चार उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. यात भानुदास देविदास भालेराव, सतीश दत्तात्रयराव पाटील या दोन अपक्ष उमेदवारासह शेख रशीद (स्वतंत्र भारत पक्ष) आणि अक्षय अनिल पाटील (अखिल भारतीय हिंदू महासभा) या चौघांचे अर्ज बाद झाले आहेत.

या चारही उमेदवारांचे अर्ज प्रस्तावांची संख्या अपुरी असल्या कारणाने बाद करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्जामध्ये दहा प्रस्तावक असणे आवश्यक आहे, हे प्रस्तावक त्याच मतदारसंघातील मतदार असावेत, ज्या मतदारसंघातून ते उमेदवारी अर्ज भरत आहे. मात्र औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील लोकांची नावे प्रस्तावक म्हणून दिली होती. तर एका उमेदवाराने दहा ऐवजी आठच प्रस्तावकांची नावे लिहिली होती. त्यामुळे हे चारही अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले. 

यांचा परिणामी म्हणून मध्य विधानसभा मतदारसंघातून आता २७ पैकी २३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.