Mon, Sep 16, 2019 11:34होमपेज › Aurangabad › वधू पित्याची धनगर आरक्षणासाठी आत्महत्या

वधू पित्याची धनगर आरक्षणासाठी आत्महत्या

Published On: Dec 18 2018 7:44AM | Last Updated: Dec 18 2018 1:27AM
औरंगाबाद : प्रतिनिधी

पिता म्हणून मुलीच्या विवाहाचे कर्तव्य मार्गी लावल्यानंतर वधूपित्याने समाजाचेही आपण देणे लागतो, असा विचार करीत धनगर आरक्षणासाठी फाशी घेऊन आत्महत्या केली. इकडे मुलगी लग्नमंडपात बोहल्यावर चढत असतानाच पित्याने घरी जाऊन समाजासाठी असेे टोकाचे पाऊल उचलले. ही धक्‍कादायक आणि खळबळजनक घटना सोमवारी धूत हॉस्पिटलसमोरील म्हाडा कॉलनीत घडली. मनजित रायभान कोळेकर (50, रा. म्हाडा कॉलनी) असे आत्महत्या करणार्‍या वधूपित्याचे नाव आहे. आता धनगर आरक्षणासाठी गेलेला  हा राज्यातील पहिला बळी ठरला आहे.   

कोळेकर यांनी दुसरी चिठ्ठी कुटुंबाला उद्देशून लिहिलेली आहे. त्यात ते म्हणतात, ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते; मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.’ ‘पत्नीनं आयुष्यात सुख दिलं. सॉरी, पण मी जातो. माझा देह दान करा, एवढीच शेवटची इच्छा’.