Sat, Aug 24, 2019 10:28होमपेज › Aurangabad › अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखाध्यक्षपदी प्रा. डॉ. दासू वैद्य

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखाध्यक्षपदी प्रा. डॉ. दासू वैद्य

Published On: Apr 05 2019 7:21PM | Last Updated: Apr 05 2019 7:21PM
औरंगाबाद : प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या औरंगाबाद शाखेची कार्यकारिणी नुकतीच घोषित झाली. जीवन विकास ग्रंथालयाच्या सभागृहात झालेल्या सभेत मान्यवर बालसाहित्यिकांच्या उपस्थितीत  शाखाध्यक्ष प्रा. दासू वैद्य, कार्यवाह विनोद सिनकर यांनी संस्थेच्या आगामी प्रकल्पांची माहिती दिली. लवकरच मराठवाडा स्तरावर बालसाहित्यिक मेळावा आणि बालसाहित्य संमेलन घेण्याची योजना उपाध्यक्ष भास्करराव आर्वीकर यांनी मांडली. 

सहकार्यवाह डॉ. विशाल तायडे आणि सदस्य गणेश घुले यांना बालसाहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. जिल्हा संस्था कोषाध्यक्ष विश्वनाथ ससे, सदस्य प्रा. लीला शिंदे, अंजली धानोरकर, धर्मराज माहूलकर, गेणू शिंदे, गणेश घुले, संदीप भदाणे यांची नावे घोषित झाली. तसेच सल्लागार म्हणून बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ, डॉ. छाया महाजन यांचा समावेश करण्यात आला. राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत गौतम यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद सिनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विशाल तायडे यांनी केले.