Tue, Jan 22, 2019 07:17होमपेज › Aurangabad › आदिवासी बांधवांसाठी एक टेम्पो भरून साहित्य गडचिरोलीला रवाना 

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी; पोलिस प्रशासनाचा उपक्रम

Published On: Nov 09 2018 4:21PM | Last Updated: Nov 09 2018 4:21PMसिल्लोड : प्रतिनिधी  

गडचिरोलीचे जिल्हा उप पोलिस अधिक्षक तसेच सध्या सिल्लोड येथे उपविभागीय पोलिस अधिकारीपदी कार्यरत असलेले गणेश बिरादार यांनी आदीवासी बांधवांसोबत दिवाळी हा उपक्रम चालू केला होता. हीच परंपरा कायम जोपासत सिल्लोड येथे कार्यरत असताना या उपक्रमासाठी दानशूर व्यक्तींनी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन बिरादार यांनी केले होते. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. तर सिल्लोड येथून या आदिवासी बांधवासाठी एक टेम्पो भरून विविध प्रकारचे साहित्य पठविण्यात आले आहे.

'दिवाळी' हा सण प्रत्येक गरीब - श्रीमंत घरात अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. परंतु गडचिरोलीतील नक्षलवादामुळे आदिवासी बांधवांच्या जीवनातील अंधार आजही पूर्णपणे कमी झालेला नाही. जिल्हा उपपोलीस अधिक्षक म्हणून गणेश बिरादार यांनी गडचिरोलीला असतांना सुरू केलेल्या यंदाची दिवाळी आदिवासीं सोबत सदरचे उपक्रम सिल्लोड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवा देतांना गेल्या वर्षापासून येथेही करीत आहेत. समाजातून केलेल्या मदतीमुळे दीपोत्सवाचा हा मांगल्याचा सण त्यांच्या जीवनात आनंद, उत्साह व प्रकाश वाढविणारा ठरत आहे.

माणुसकीच्या नात्याने, व उदात्त हेतूने आपण सर्वजण मिळून आदिवासी बांधवांच्या आनंदात भर घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंसह दिवाळीचा आनंद आदिवासी बांधवांना मिळावा या हेतूने सिल्लोड उपविभागीय पोलीस प्रशासनाने यंदाचीही दिवाळी आदिवासी बांधवांसोबत या सामाजिक उपक्रमांनी आपली दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेत, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आदिवासी बांधवांसाठी मदतीची हाक दिलेली होती. या उपक्रमाला सोयगाव तालुकतातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे व भरभरून प्रतिसाद देत सिल्लोड येथून एक टेम्पो भरून विविध प्रकारचे साहित्य पाठविण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली आहे.