Sun, Apr 21, 2019 06:19होमपेज › Aurangabad › सिल्लोड येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे तहसिल समोर निदर्शने

सिल्लोड: नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने

Published On: Nov 08 2018 2:35PM | Last Updated: Nov 08 2018 2:54PMऔरंगाबाद (सिल्लोड) : पुढारी ऑनलाईन 

केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दोन वर्षांपूर्वी कुठलेच नियोजन न करता अचानकपणे नोटा बंदीचा निर्णय देशावर लादून जवळच्या बगल बच्चाची खिसे भरून सामान्यांना रस्त्यावर आणण्याचे पाप केले होते.त्याच बरोबर देशात अनेक जनविरोधी निर्णय घेऊन जनतेवर उपासमारीची वेळ आणली. सरकारच्या विरोधात व सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करणाऱ्या घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.  

सिल्लोड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हाउपाध्यक्षा दुर्गाताई पवार, युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव रुपेश जैस्वाल, विधानसभा अध्यक्ष धैर्यशील तायडे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नोटा बंदी, महागाई,, जाचक जीएसटी व राफेल घोटाळे करणाऱ्या खोटरड्या व घोटाळेबाज सरकारच्या निषेधार्थ तहसिल कार्यालयाच्या समोर प्रचंड निदर्शने करून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.सरकारच्या विरोधात केलेल्या निदर्शनानंतर नायब तहसिलदार पठाण यांना निवेदन देण्यात आले.

या निदर्शनात उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर सहारे, नरसिंहराव चव्हाण, शिवाजी दाभाडे, रऊफ बागवान, अमित आरके, शेख मोहसीन, विठ्ठलराव सपकाळ, डॉ. फिरोज खान, सतिष ताठे, मतीन देशमुख, पं स सदस्य शेख सलीम, अली चाऊस, संजय आरके, मोहमद इसाक, दामुअण्णा गव्हाणे, मनोहर आरके, गोविंदराव लोखंडे, सत्तार हुसेन, वाहेद मुजावर, रघुनाथराव गोराडे, मोहमद हनिफ, लक्ष्मण कल्याणकर, जितेंद्र आरके, जमीर मुलतानी, संदीप सपकाळ, सलीम हुसेन, अमित कळम, अंकुश तायडे, गौरव सहारे, रवी आरके, सखाराम अहिरे, राजेश्वर आरके, सवरस्वती धाडगे आदींसह काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्याचा या निदर्शनात सहभाग होता.