Mon, Sep 16, 2019 05:46होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न 

औरंगाबादमध्ये दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न 

Published On: Aug 15 2018 2:26PM | Last Updated: Aug 15 2018 2:25PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‌ध्वजारोहन कार्यक्रमावेळी बुधवारी(दि. १५) विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोघांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्तालय व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालकमंत्री सावंत यांचे विभागीय आयुक्तालयात आगमन होताच कंडारी तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील सरपंच सुरेखा दाभाड़े व  पती मुकुंद दाभाडे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविले. यावेळी त्यांनी सोबत आणलेले रॉकेल अंगावर  ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेतले.

दुसऱ्या घटनेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड़ तालुक्यातील भगवान वारे या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यासाठी विष सोबत आणले होते. हेल्मेट घालून ते गेटमधून आत जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेतील दोघानांही सिटी चौक पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्यांना समज देऊन सोडण्यात  आल्याची माहिती सिटी चौक पोलिसांनी दिली.