Mon, Nov 20, 2017 17:23होमपेज › Aurangabad › शिवसेनेच्या आमदारांना भाजपकडून ५ कोटींची ऑफर : जाधव

शिवसेनेच्या आमदारांना भाजपकडून ५ कोटींची ऑफर : जाधव

Published On: Nov 15 2017 11:34AM | Last Updated: Nov 15 2017 11:50AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शिवसेनेच्या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्याकडून पाच कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघाचे आमदार आहेत.

हर्षवर्धन जाधवांच्यासह सेनेच्या २५ आमदारांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली होती. गेल्या महिन्यात ही ऑफर दिल्याचे आमदार जाधव यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. “निवडून न आल्यास तुम्हाला विधानपरिषदेवर घेऊ, शिवाय निवडणुकीचा सगळा खर्च आम्ही करु,” असेही सांगण्यात आल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या कुरबुरींमुळे भाजप त्रस्त आहे. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार आम्हाला मिळतात का, यासाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटींची ऑफर देऊन, त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणून, त्यांना भाजपमध्ये घ्यायचं आणि शिवसेनेला बाजूला करायचं, असे सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

बदल्यांची काही प्रकरणे असतील, कोणाच्या बदल्या करायच्या असतील, तर सगळं सांगा आणि तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला निवडणूकी शिवाय निवडून आणू, निवडणुकीमध्ये पैसे खर्च करु, अशा पद्धतीने तुम्ही आमच्यात सामील व्हावे. याप्रकारे शिवसेनेचे इतर आमदारही सहभागी झाले तर शिवसेनेच्या त्रासातून आम्ही मुक्त होऊ, असेही भाजपकडून सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.