Thu, May 28, 2020 09:04होमपेज › Aurangabad › औरंगाबाद, जालना मतदारसंघ कुणाला देऊ नये : आमदार अब्‍दुल सत्‍तार 

औरंगाबाद, जालना मतदारसंघ कुणाला देऊ नये : आमदार अब्‍दुल सत्‍तार 

Published On: Mar 13 2019 3:25PM | Last Updated: Mar 13 2019 3:16PM
औरंगाबाद : प्रतिनिधी 

औरंगाबाद काँग्रेसतर्फे औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली जाईल, हे मतदारसंघ कुणाला देऊ नये, अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. तरीही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि शरद पवार यांनी काही बदल केल्यास त्यांचा तो निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील व त्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक राहील, असे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जालना मतदारसंघातून माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे किंवा मी उमेदवार राहील, असेही सत्तार म्हणाले. डॉक्टर काळे यांना निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील. मला तिकीट मिळाल्यास प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी त्यांची राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांचे नाव एक नंबरवर असल्याचे सत्तार म्हणाले. 

औरंगाबाद व जालना या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास डॉक्टर काळे यांनी व्यक्त केला. काँग्रेसतर्फे औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवली जाईल. औरंगाबाद व जालना या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास डॉक्टर काळे यांनी व्यक्त केला.