Mon, Sep 16, 2019 05:55होमपेज › Aurangabad › गोदापात्रेत वाळू चोरांवर महसुल पथकाची कारवाई 

गोदापात्रेत वाळू चोरांवर महसुल पथकाची कारवाई 

Published On: Aug 26 2018 6:00PM | Last Updated: Aug 26 2018 6:00PMपैठण : मनोज परदेशी 

आज रविवार दि. २६/०८/१८ रोजी दुपारी ४:०० वाजता मौ.टाकळी अंबड ता. पैठण येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करून साठा केलेल्या ठिकाणावर तहसील कार्यालय पैठण च्या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये २५० ब्रास वाळूचा साठा व एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. सदरील जप्त वाळूसाठा व वाहन या मुद्देमालाची बाजारी किंमत अंदाजे २० लाख रूपये आहे. सदरील वाळूसाठा गावाच्या तलाठींच्या ताब्यात देण्यात आला असून, ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालय पैठण येथे जमा करण्यात आले आहे. १५ ॲागस्ट नंतरच्या सलग सुट्या व रक्षाबंधन ची सुटी पाहून चोरट्यांनी सदर वाळू चोरून विक्री करण्याचे उद्देशाने साठवली होती. परंतु गोपनीय माहितीने तहसीलदार महेश सावंत, तलाठी हुग्गे व महसूलच्या पथकाने कारवाई करून वाळू चोरांचे मनसुबे उधळून लावले आहेत.

गावातील लोकांनी वाळूमाफियांच्या दहशतीमुळे संबंधीत वाळू चोरांची नावे माहित नाहीत  असे सांगून माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधीत वाळू चोरांविरूध्द गुन्हा नोंदवण्यात येणार असून, मोक्का अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार महेश सावंत यांनी दै पुढारीशी बोलतांना सांगितले.