Fri, May 29, 2020 00:27होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : कुंभेफळमधून अवैध देशी दारूचे १०० बॉक्स जप्त

औरंगाबाद : कुंभेफळमधून अवैध देशी दारूचे १०० बॉक्स जप्त

Published On: May 16 2019 5:59PM | Last Updated: May 16 2019 5:59PM
करमाड : प्रतिनिधी 

कुंभेफळ (ता.औरंगाबाद) येथून अवैधरित्या देशी दारूचे १०० बॉक्स करमाड पोलिसांनी जप्‍त केले आहेत. या बॉक्‍समध्‍ये ४ हजार ८०० बाटल्‍या आहेत. या बाटल्‍यांची किंमत एकूण ३ लाख ८४ हजार असून गाडीची किंमत २ लाख रुपये  आहे. असा एकूण ५  लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी द्वारकाधीश ईश्वरलाल जैस्वाल (रा. कुंभेफळ, ता.औरंगाबाद) यास ताब्यात घेण्यात आले आहे. 

औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधिक्षकपदाचा मोक्षदा पाटील यांनी पदभार घेतल्यापासून ग्रामीण भागातील प्रत्येक ठाण्याला ऊर्जाच निर्माण झाल्याचे चित्र आहे. करमाड पोलिसानी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यापासून पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाहीचा सपाटा सुरू केला आहे. यामध्‍ये अवैधरित्या वाळू, दारू, जुगार आड्डे, उशिरापर्यंत हॉटेल चालवणाऱ्या विरोधात जागोजागी छापे कडून केलेल्या कार्यवाहीमुळे सळो की पळोची वेळ आली आहे. 

एप्रिल हिट कार्यवाहीनंतर पुन्हा बुधवारी (दि.१५) कुंभेफळ (ता. औरंगाबाद) शिवारात सापळा रचून एका पीकअपमधून ३ लाख ८४ हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. ही कार्यवाही रात्री १० वाजून १५ मिनिटांनी खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे केली आहे.

एम एच २० ए.टी १०८५ या क्रमांकची महिंद्रा पीकअप उभी होती. करमाड पोलिसांनी अचानक धाड टाकून या पीकअप तपासली केली असता त्यामध्ये अवैधरित्या देशी दारूचे १०० बॉक्स मध्ये ४ हजार ८०० बॉटल ज्याची किंमत एकूण ३ लाख ८४ हजार असून गाडीची किंमत २ लाख रुपये आहे. अशा एकूण ५  लाख ८४  हजार रुपयांचा मुद्देमाल करमाड पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीत जप्त करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाहीत गाडीतील द्वारकाधीश ईश्वरलाल जैस्वाल (रा. कुंभेफळ, ता.औरंगाबाद) यास ताब्यात घेण्यात आले. औरंगाबाद तालुक्यातील करमाड पोलिसांनी आतापर्यंतच्या करमाड पोलिस ठाण्यातील हद्दीतील अवैधरित्या विक्री केल्या जाणाऱ्या दारूची  सर्वात मोठी कारवाई आहे. 

एप्रिल महिन्यापासून सुरू असलेल्या कार्यवाही पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश गावडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे. कुंभेफळ येथील कार्यवाही पोलिस निरीक्षक आदिनाथ रायकर, उपनिरीक्षक सुशांत सुतळे, चाबुकस्वार, पारवे साहेब, भदाणे आदींनी पार पाडली. सदर कार्यवाहीत गाडी चालकास ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.