Tue, Sep 17, 2019 04:20होमपेज › Aurangabad › अजिंठा पोलिसांकडून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

अजिंठा पोलिसांकडून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त

Published On: Apr 04 2019 5:53PM | Last Updated: Apr 04 2019 5:12PM
शिवना : प्रतिनिधी

सिल्लोड तालुक्यातील जळकीबाजार येथील धामणा मध्यम प्रकल्पातील धरण क्षेत्रात उगवलेल्या घनदाट झाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या गावठी दारूच्या अवैध अड्डयांवर छापे मारून अजिंठा पोलीसांनी बुधवारी (दि. ३ ) रोजी दारू निर्मितीचे ७०० लीटर रसायन नष्ट केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय शाखेचे पोलिस नाईक अजित शेकडे, बिट जमादार दत्तात्रय मोरे यांनी ही कारवाई केली.

जळकीबाजार या धरणामध्ये पाणी नसल्याने तेथे घनदाट झाडे उगवलेली आहेत. या गर्द झुडपांचा फायदा घेत काही जणांनी गावठी दारू निर्मितीचे अड्डे सुरु केले असल्याची माहिती गोपनीय शाखेचे पोलिस नाईक अजित शेकडे यांना मिळाली होती. या माहितीची दखल घेऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय मोरे, पोलिस नाईक शेकडे, आदिनी बुधवारी दुपारी एकच्या सुमारास छापा टाकला. यामध्ये पाच ड्रम, सातशे लिटर रसायन नष्ट करून हातभट्टया उध्वस्त केल्या. मात्र पोलीसांची चाहूल लागताच हातभट्टीचालक झुडपांचा फायदा घेत पसार झाले आहेत. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या फिर्यादीवरून बाबू आब्बास तडवी, नजीमोद्दीन सिंकदर तवडी, सांडू आब्बास तडवी, चांद रसूल तडवी (सर्व रा. जळकीबाजार) यांच्याविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex