Mon, Jun 01, 2020 22:30
    ब्रेकिंग    होमपेज › Arthabhan › चकाकता हिरा : व्हेसुव्हीअस

चकाकता हिरा : व्हेसुव्हीअस

Published On: May 13 2019 2:07AM | Last Updated: May 13 2019 2:07AM
यावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘व्हेसुव्हीअस’चा विचार करता येईल. सध्या या शेअरचा भाव 1140 रुपये आहे. येेत्या बारा महिन्यात तो 1575 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरातील या शेअरचा कमाल व किमान भाव अनुक्रमे 1354 रुपये व 971 रुपये होता. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 25.65 पट पडते. या शेअरमध्ये मात्र व्यवहार कमी होतो. पोलाद उद्योग सध्या जगभरात मंदावलेला आहे. भारतही त्याला अपवाद नाही. पुढील वर्षात बांधकाम, महामार्ग इत्यादी क्षेत्रात पोलादाची मोठ्या प्रमाणावर गरज लागणार आहे आणि त्यात व्हेसुव्हीअसचा मुख्य वाटा असेल.
कंपनीचे गेल्या चार वर्षांचे आकडे खालीलप्रमाणे आहेत.
 
बाबी                           डिसेंबर 16    डिसेंबर 17    डिसेंबर 18    डिसेंबर 19       
विक्री                             821             912             825             1097       
नक्‍त नफा                        69               94               92              119       
शेअरगणिक उपार्जन       41.8             43.7           45.8                59     

2020 या वर्षासाठी अपेक्षित विक्री 1161 कोटी रुपये आहे. नफा 146.5 कोटी रुपये आहे. 2020 ला संभाव्य विक्री 72 रुपये असेल. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर 25 पट आहे. ते दोन वर्षांनी 15.5 पट इतके आकर्षक होईल. कंपनीचे भागभांडवल 20.3 कोटी रुपये आहे. कंपनीवर कर्ज काहीही नाही. कंपनीने दर शेअरला 7 रुपये लाभांश दिला होता. डिसेंबर 2019 व डिसेंबर 2020 साठी तो अनुक्रमे 9 रुपये व 11 रुपये व्हावा. कंपनी रिफॅक्टरी क्षेत्रात आहे.

गेल्या तिमाहीची विक्री 223 कोटी रुपये होती आणि नक्‍त नफा 126 कोटी रुपये होता. कंपनी आपले उत्पादन टाटा स्टील, स्टील अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया व जे. एस. डब्ल्यू. स्टील यांना विकत आहे. या सर्व कंपन्या 2030 सालापर्यंत आपले उत्पादन वाढवणार आहेत. वेदांत, झारखंडमध्ये 22000 कोटी रुपये गुंतवून आपला एक नवीन कारखाना काढणार आहे. व्हेसुव्हीअस वेदांंंतलाही आपले उत्पादन विकू शकेल. त्यामुळे भविष्यकाळात या कंपनीला चांगले दिवस आहेत.