Sun, Feb 24, 2019 02:18होमपेज › Arthabhan › स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतो

स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतो

Published On: Feb 12 2018 1:38AM | Last Updated: Feb 12 2018 1:38AMमागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 34005 अंकाला तसेच निफ्टी 10454 अंकाला बंद झाला.सप्ताहअखेर शुक्रवारी  सेन्सेक्सने 407 अंकांची अंकांची तसेच निफ्टीने 121 अंकांची मंदी दर्शवली.साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक नकारात्मक म्हणजेच मंदीचा कल दर्शवत आहे .अल्पावधीच्या आलेखानुसार पुढील आठवड्यासाठी  निफ्टीची 10276 तसेच सेन्सेक्सची 33483 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. शेअर मार्केटमध्ये सिक्युरिटी ट्रँझॅक्शन टॅक्स म्हणजेच एस टी टी लागू असतानादेखील अर्थसंकल्पात लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू केल्याने तसेच आंतरराष्ट्रीय मार्केटनेसुद्धा  नकारात्मक  संकेत दिल्याने अर्थसंकल्पानंतर निर्देशांकाने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली.

मागील लेखांमधे नमूद केल्यानुसार अशा वेळेस नमूद केल्यानुसार ऑप्शन मार्केटमध्ये मर्यादित धोका स्वीकारून मंदीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरले. शेअर मार्केटमध्ये यशस्वी ट्रेडिंग करण्यासाठी तेजीच्या काळात तेजीचे तसेच मंदीच्या काळात मंदीचे व्यवहार करणे म्हणजेच दिशा ओळखून व्यवहार करणे फायदेशीर ठरते. साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक अद्यापही मंदीचाच  कल  दर्शवत आहे; यामुळे  पूर्वीपेक्षा शेअर्सचा भाव स्वस्त झाला म्हणून खरेदीची गडबड करू नये कारण आगामी कालावधीमध्ये निर्देशांकाने आणखी मंदी दर्शविल्यास स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होऊ शकतात. यामुळे जोपर्यंत सक्षम तेजीचे संकेत मिळत नाहीत तोपर्यंत गुंतवणूकदारांनी गडबड करून तेजीचे व्यवहार करू नयेत म्हणजेच योग्य संकेत मिळेपर्यंत स्टे-अवे पवित्रा स्वीकारणे योग्य ठरेल.

भूषण गोडबोले (सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार)