Sat, Sep 21, 2019 06:48होमपेज › Arthabhan › अर्थव्यवस्था सुधारण्यास वाव...

अर्थव्यवस्था सुधारण्यास वाव...

Published On: Jun 10 2019 1:25AM | Last Updated: Jun 10 2019 1:25AM
डॉ. वसंत पटवर्धन

भारताच्या नव्या अर्थमंत्री श्रीमती निर्मल सीतारामन या आपल्या पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला लोकसभेत मांडतील. आपली प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची सीमा सध्याच्या 5 लक्ष रुपयांवरून 8 लक्ष रुपयांवर नेतील अशी अटक ल आहे.

गेल्या आठवड्यात गुरुवारी रिझर्व्ह बँकेने सलग तिसर्‍यांदा रेपो दरात कपात केली असून 6 टक्क्यावरून तो 5.75 टक्क्यावर आला आहे.सरकारी व खासगी बँकांकडून कमी दरात गृहकर्जे उपलब्ध होतील, अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी व्यक्त केली आहे. जानेवारी ते मार्च 2019 या तिमाहीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकसाचा दर 5.8 टक्क्यापर्यंत घसरल्याचे दिसते. विकासदराचा हा गेल्या पाच वर्षातील नीचांक आहे. पतधोरण समितीच्या सर्व म्हणजे सहाही सदस्यांनी या दर कपातीस मंजुरी दिली. गेल्या सहामाहीत किरकोळ महागाई 3 ते 3.1 टक्के इतकी खाली आली आहे. पर्जन्यमानही अशाश्‍वत आहे त्यामुळे फळे-भाज्या महागले आहे. कच्चा पेट्रोलचे जागतिक दरही कमी झालेले नाहीत. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी रेपो दरातील कपात उपयोगी पडू शकेल RTGS, NEFT याच्यासाठी लागणारे शुल्क काढून टाकण्यात आले आहे. तशा सूचना रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिल्या आहेत. 

अर्थव्यवस्था जोम धरीत नाही तसेच विशेष न्यायालयातही 9500 दावे प्रलंबित आहेत. लोकशाहीचा हा स्तंभही त्यामुळे सुधारण्याची वाट बघत आहे. सध्या न्यायालयात दररोज किमान 500 दाव्यांसाठी त्वरित तारखा देण्याचे विचाराधीन आहे. 

इंडिया पोर्टेबिलीटीचा प्रयोग मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअरबाजार यात 1 जूनपासून सुरू झाला आहे. त्यामुळे एका ठिकाणी खरेदी करून दुसर्‍या ठिकाणी विक्री करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. ज्या निर्देशकांची दोन्ही ठिकाणी खाती असतील त्यांना एका ठिकाणी खरेदी-विक्री करून त्याच दिवशी दुसर्‍या बाजारावर विक्री-खरेदीचे व्यवहार करता येतील. अर्थात लहान निवेदशकांना याचा काही उपयोग नाही. 

जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सध्या अमेरिकेकडे आहे. तिच्याकडे असलेल्या 8,138 टनाची किंमत 373 अब्ज डॉलर्स आहे. त्यानंतर जर्मनी दुसर्‍या क्रमांकावर असून तिचा सोन्याचा साठा 3 हजार 169 टन आहे. त्याची किंमत 154 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे 2814 टन सोने असून त्याची किंमत 129 अब्ज डालर्स आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापारयुद्ध सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील सोन्याच्या साठ्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजची 70 पेक्षा जास्त औषधांची विक्री चीन मध्ये होत असल्यामुळे या आकड्याला महत्त्व आहे. 

वॉरन बफे यांनी आय.सी.आय.सी.आय. पु्रडेन्शिअल लाईफमध्ये कंपनीच्या भांडवलापैकी 14 टक्के गुंतवणूक केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सध्या  एकाच वेळी चीन-भारत व इराण यांच्याबरोबर व्यापारयुद्ध खेळत आहेत. भारताचा GDP (ग्रॉस डोमेस्टीक प्रॉडक्ट)-(सकल राष्ट्रीय उत्पादन) 5 वर्षातील किमान पातळीवर आला असल्यामुळे आणि भारतातील बेरोजगारीने गेल्या 50 वर्षांतील उच्चांक गाठला असल्यामुळे अमेरिकेतील शेअरबाजार चिंतेत आहे.  मात्र खुद्द अमेरिकेतच तिचे राष्ट्रीय कर्ज 22.5 ट्रिलीयन इतके झाल्यामुळे पुन्हा 2006 सालची पुनरावृत्ती होईल की  काय, अशी भीती काही अर्थतज्ञांना पडत आहे. भारतानेही सुरक्षेचा उपाय म्हणून अमेरिकेसारखी ट्रेझरी बाँडमधून आपली गुंतवणूक काढून सोन्यात तिचे रूपांतर करण्याचे ठरविले आहे. पुन्हा जर मंदी निर्माण झाली तर तिचा फटका अमेरिकेतील बँकांना बसू शकेल.  गेल्या शुक्रवारी हा लेख लिहिताना सकाळी निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 39561 आणि 11854 वर होते. बजाज फायनान्स सध्या 3481 रुपयांवर उपलब्ध आहे. भारताच्या नव्या अर्थमंत्री श्रीमती निर्मल सीतारामन या आपल्या पहिला अर्थसंकल्प 5 जुलैला लोकसभेत मांडतील. आपली प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची सीमा सध्याचा 5 लक्ष रुपयांवरून 8 लक्ष रुपयांवर नेतील अशी अटकल आहे. शेतकर्‍यांसाठी 72000 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची जी घोषणा झाली आहे, तिच्यासाठी तरतूद करणे हे त्यांचे मोेठे आव्हान असेल. आर.बी.आय.ने या पतधोरणामध्ये ॠजुता दाखवली असल्यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होईल. हडको (हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट) 1500 कोटी रुपयांचे अपरिवर्तनीय रोख विक्रीला काढणार आहे.

PWC मीडिया अँड एन्टरटेन्मेंटने भारताच्या मध्यम व लघू उद्योगांच्या वाढीबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.  या अहवालानुसार भारताचा चक्रवाढ वाढीचा वार्षिक दर (CAGR) पुढील पाच वर्षात 11.28 टक्के असेल. त्यामुळे 2023 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 4021 ट्रिलीयन रुपये इतकी होईल.
लार्सेन अ‍ॅड टूर्बोने माईंड ट्री मधील आपली गुंतवणूक 28 टक्क्यांपर्यंत नेली आहे.
सागर सिमेंटने मे महिन्यात आपले सिमेंटचे उत्पादन 2,77.146 मेट्रिक टन इतके जाहीर केले आहे.

‘हाइडेन बर्ग’

यावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘हाइडेन बर्ग’ सिमेंटची निवड केली आहे. सध्या हा शेअर 210 रु.ला उपलब्ध असून तो 265 रुपयांपर्यंत जावा. (वर्षभरात) सध्या या कंपनीचे उत्पादन क्षमतेच्या 90 टक्के इतके आहे. मार्च 2019 च्या तिमाहीत कंपनीचे 8 ते 10 दिवस कारखाने बंद होते. पण सर्व सिमेंट कंपन्यांची हीच परिस्थिती होती. कंपनीला सध्या दर टनामागे 938 रुपयांचा भाव मिळत आहे. मार्च 2018 ला संपलेल्या वर्षासाठी हा भाव फक्त 719 रुपये होता. म्हणजे वर्षभरात 30 टक्क्यांची वाढ दिसत आहे. कंपनीने आपली 150 कोटी रुपयांची कर्जे नुकतीच फेडली आहेत. काही लहान कंपन्यांचे आग्रहण करून कंपनी उत्पादन वाढवणार आहे. कंपनीचे 2017 मार्च, 2018 मार्च, 2019 मार्च, या तीन वर्षांचे प्रत्यक्ष आकडे व मार्च 2020 व मार्च 2021 चे संभाव्य आकडे पुढे दिले आहेत. त्यावरून कंपनी किती प्रगतिपथावर आहे हे दिसून येईल. 

कंपनीचे भाग भांडवल 226.6 कोटी रुपये आहे. नक्त मूल्य या 5 वर्षासाठी अनुक्रमे 967 कोटी रुपये, 1046 कोटी रुपये, 1170 कोटी रुपये, 1330 कोटी रुपये व 1500 कोटी रुपये आहे. कंपनीने शेअरमागे या वर्षी 4 रुपयाचा लाभांश दिला आहे. लाभांशापोटी नफ्यातील फक्त 42 टक्केच रक्कम वापरली जाते. सध्या पावसाळा आल्यामुळे सिमेंट व पोलाद उत्पादनाला मागणी कमी आहे.  त्यामुळे शेअरचे भाव कमी राहतात व गुंतवणुकीला चांगली संधी असते. माफक प्रमाणात इथे गुंतवणूक करायला हरकत नाही.