Sun, Dec 08, 2019 06:34होमपेज › Arthabhan › .... तर शेअर बाजार बाळसे धरेल!

.... तर शेअर बाजार बाळसे धरेल!

Published On: Aug 05 2019 1:30AM | Last Updated: Aug 05 2019 1:30AM
डॉ. वसंत पटवर्धन
 

गेल्या शुक्रवारी मुंबई बाजाराचा निर्देशांक 37118 होता, तर निफ्टी 10997 वर बंद झाला. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने अकरा वर्षांनंतर व्याज दरात पाव टक्क्याची कपात केली आणि अर्थकारणाचा आढावा ऊणणखडक असा घेतला. या आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय धोरण समितीची बैठक आहे. तिनेही कदाचित रेपो दर पाव किंवा अर्धा टक्क्यानेही कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले, तर शेअर बाजार बाळसे धरेल. सध्या तो संथ आहे. 
 

गेल्या शुक्रवारी येस बँक 88.6 रुपयांवर बंद झाला. रोज सुमारे दहा कोटी शेअर्सचे व्यवहार होत आहेत. सध्याच्या भावाला किं /उ गुणोत्तर 38 पट दिसले, तरी ते फसवे आहे. बँकेने 2018-19 वर्षात अनार्जित कर्जापोटी भरपूर तरतूद केली आहे. त्यामुळे शेअरचा भाव सतत वाढत जाईल. जोखीम घेऊ शकणार्‍या निवेशकांनी येस बँकेची सध्या खरेदी करून वर्षभर थांबावे. कर्जात किमान 40 टक्के नफा सहज व्हावा.

स्टरलाईट टेक्नॉलॉजीचा जून 2019 तिमाहीचा नफा 141 कोटी रुपये झाला. गेल्या जूनपेक्षा तो 17 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या मार्चमध्ये तो 120.71 कोटी रुपये होता. या जूनमध्ये विक्री 63 टक्क्यांनी वाढून 1431.99 कोटी रुपये झाली. गेल्या जूनची विक्री 876.89 कोटी रुपये होती. सध्या या शेअरचा भाव 151 रुपयापर्यंत खाली आला आहे. स्टरलाईटने अमेरिकेमध्ये आपल्या कंपनीची  प्रसिद्धी करण्यासाठी एक ‘लॉबिस्ट’ नेमला आहे. रोज किमान 8 लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 10.55  पट पडते. गेल्या बारा महिन्यांतील त्याचा उच्चांकी भाव 400 रुपये होता. सध्या हा शेअर विकत घेतल्यास 40 टक्के नफा वर्षभरात सहज व्हावा.

जिंदाल स्टील गेल्या शुक्रवारी 225 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा जून 2019 तिमाहीचा नफा 50 टक्क्यांनी कमी झाला आहे. कंपनीने कर्नाटकातील खाणीसाठी बोली लावल्या आहेत. झीशषशीीशव इळववशी म्हणून तिला पसंती मिळाली आहे. 

GHCL सध्या 205 रुपयांना उपलब्ध आहे. तिचा जून 2019 तिमाहीचा नफा गेल्या जूनपेक्षा 54 टक्क्यांनी जास्त आहे. या शेअरचा विस्तृत परामर्श चकाकता हिर्‍यात घेतला आहे. 
भारताच्या एप्रिल-जूनमधील कर महसुलातील वाढीचे प्रमाण गेल्या 10 वर्षांतील किमान पातळीवर आहे.

क्रिसीलने भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन नजीकच्या भविष्यात 7.1 टक्क्यांऐवजी 6.9 टक्क्यांनीच वाढणार आहे. आतापर्यंत झालेला अनिश्चित पावसाळा, जागतिक अर्थव्यवस्थेत येऊ घातलेली मंदी ही त्याची कारणे आहेत.

भारती एअरटेलचा या जून तिमाहीत नफा होण्याऐवजी 2866 कोटी रुपये तोटा झाला आहे. दर गिर्‍हाईकामागे उत्पादन 6 टक्क्यांनी वाढून माणसी 129 रुपये झाले असले, तरीही ही परिस्थिती आहे. 
एचडीएफसीचा अलेखा परीक्षित जून 2019 च्या तिमाहीचे उत्पन्न 23,239 कोटी रुपये होते. मागील जूनमध्ये ते 19,773 कोटी रुपये होते. वर्षात 17॥ टक्क्यांची वाढ दिसते. नक्त नफा यावेळी 3539 कोटी रुपये झाला आहे. जून 2018 तिमाहीसाठी तो 1570 कोटी रुपये होता. मार्च 2019 तिमाहीसाठी तो 4811 कोटी रुपये होता. मार्च 2019 ला संपलेल्या पूर्ण वर्षाचे शेअरगणिक उपार्जन 94.57 रुपये होते. या आधीच्या वर्षाचे उपार्जन 71.48 रुपये होते. गुंतवणुकीतील विक्रीमुळे 1894 कोटी रुपयांचा नफा झाला; पण वित्तीय गुंतवणुकीचे बाजारमूल्य 890 कोटी रुपयांनी कमी झाले.

कंपनीने दिलेली एकूण कर्जे 4.16 लक्ष कोटी रुपये आहेत. ढोबळ अनार्जित कर्जाची टक्केवारी 129 आहे. बँकेच्या संचालक मंडळाने अपरिवर्तनीय सुरक्षित मुद्दलफेडीचे कर्जरोखे 45000 कोटी रुपयांचे काढायचे ठरवले आहे. खासगी निवेशकांना हे टप्प्याटप्प्याने दिले जातील. कंपनीचा व्यवहार आयुर्विम्यामध्ये 35 टक्के,  सर्वसाधारण विम्यामध्ये 9.5  टक्के, कर्जामध्ये 54 टक्के  आणि जिंदगी व्यवस्थापनामध्ये 2.5 टक्के असा आहे. कर्ज व्यवहारामध्ये वर्षात 30 टक्क्यांनी वाढ आहे. आयुर्विमा व्यवसायात 16.5 टक्के वाढ आहे. सर्वसाधारण विम्यात 7 टक्के आहे आणि जिंदगी व्यवस्थापनात 10 टक्के वाढ आहे. जिंदगी व्यवस्थापनातील नफा 44 टक्के होता. कर्ज व्यवहारातील नफा 28 टक्के, आयुर्विमा व्यवहारात 6॥ टक्के आणि  सर्वसाधारण विम्यात 16 टक्के अशी वाढ आहे. 

कंपनीने अपोलो म्युनिच हेल्थ इन्शुरन्स कंपनीत 51.2 टक्के आग्रहण करण्याचा करार केला आहे. कंपनीच्या शेअरचे पुस्तकी मूल्य 417 रुपये आहे. विदेशी गुंतवणूक संस्थांकडे कंपनीचे 74.6 टक्के भांडवल आहे. विमा कंपन्यांची 6.4 टक्के एचडीएफसीच्या शेअर्सचा उच्चांकी भाव 2357 रुपये होता. सध्या शेअरचा भाव 2125 रुपयाच्या आसपास आहे. अर्थमंत्री सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी क्षेत्रातील बँकप्रमुखांना 5 ऑगस्टला भेटणार आहेत. नॅशनल हाऊसिंग बँक 100 अब्ज रुपये गृहवित्त कंपन्यांत घालणार आहे.

एका ताज्या बातमीनुसार केंद्र सरकार काश्मीरचे विभाजन करणार आहे. जम्मूचे एक स्वतंत्र राज्य असेल, तर काश्मीर खोरे आणि लडाख केंद्रशासित  प्रदेश असतील. तेथील गव्हर्नर दिल्लीतून काम करेल. पुढच्या आठवड्यात हे शक्य झाल्यास 370 व 35 अ ही कलमे रद्द होतील. 

महाराष्ट्रातील  विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होऊ घातल्या आहेत. भाजप व शिवसेना एकत्रितपणे युती करून त्या लढवण्याची शक्यता कमी होत आहे. दोन्हीही पक्ष स्वबळावर लढले, तरी भाजपला स्वतःला 150 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास आहे; मात्र युतीने एकत्रित निवडणूक लढवल्यास 230 जागांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.