Thu, Nov 14, 2019 06:19होमपेज › Arthabhan › चकाकता हिरा : APL Apollo Tubes

चकाकता हिरा : APL Apollo Tubes

Published On: Jul 08 2019 1:30AM | Last Updated: Jul 08 2019 1:30AM
यावेळचा चकाकता हिरा म्हणून 'APL Apollo Tubes' ची निवड केली आहे. सध्या या शेअरचा भाव 1670 रुपये आहे. गेल्या बारा महिन्यातील किमान भाव 1003 रुपये, तर कमाल भाव 1840 रुपये होता. रोज सुमारे 25 ते 30 हजार शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला 27 पट किं/ऊ गुणोत्तर दिसते.

ए पी एल अपोलोचे पहिल्या तिमाहीची विक्री 29 टक्क्यांनी वाढून 3,88000  टनावर गेली. तिचे चारही कारखाने पूर्णपणे उत्पादन देतात. जून 2019 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीत तिने अपेक्षित 24 टक्के विक्री केली आहे. कंपनीचा कारभार वाढण्यासाठी, कंपनी बांधकामात लागणार्‍या पोलादी नळ्यांच्यावर भर देत आहे. Direct Forming Techonology (DFT) चा ती वापर करत आहे. उत्पादन क्षेत्रात ती नावीन्यपूर्ण वस्तू आणत आहे. विक्रीसाठी तिचे वितरण व्यवस्थेचे जाळे उत्तम आहे. तिने नुकतेच 2 लाख टन निर्मितीचा एक कारखाना शंकरा बिल्डिंगकडून घेतला आहे. कंपनीने नुकतीच अपोलो ट्रायकोट अशी एक पोट कंपनी स्थापन केली आहे. वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तिची विक्री 10000 टन होती.

वर्षभरात हा शेअर 40 टक्क्याने वाढून 2300 रुपयापर्यंत जाईल. शेअरगणिक उपार्जन येत्या दोन वर्षात 50 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. झळाळीच्या आणि चौकोनी पाईप्सची तिची निर्मिती आहे. बाजारातील एकूण मागणी ती 50 टक्के पुरी करते. देशात घरबांधणीचे  प्रकल्प आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प जसजसे वाढतील तसतशी ए पी एल आणि तिच्या उपकंपनीच्या उत्पादनांना जास्त मागणी येईल. अपोलो ट्रायकोट या कंपनीत ए पी एल ची 51 टक्के गुंतवणूक आहे. अपोलो ट्रायकोटची पहिल्या तिमाहीच्या चौपट विक्री वर्षात होईल. कंपनीची 2017 साली नक्त विक्री 3924 कोट रुपये होती. मार्च 2019 ला संपलेल्या वर्षात विक्री 7152 कोटी रुपये झाली.  मार्च  2020 व मार्च 2021 ला तिचे शेअरगणिक उपार्जन 144 रुपये व्हावे.