Sun, Feb 24, 2019 03:05होमपेज › Arthabhan › येस बँक 

येस बँक 

Published On: Oct 08 2018 12:54AM | Last Updated: Oct 08 2018 12:54AMयावेळचा चकाकता हिरा म्हणून ‘येस बँक’ शेअरची निवड केली आहे. खासगी क्षेत्रात 27 वर्षे अग्रगण्य असलेली ही बँक सध्या, रिझर्व्ह बँकेने तिचे अध्यर्वू व संस्थापक प्रवर्तक राणा कपूर यांना फक्‍त जानेवारी 2019 अखेरपर्यंतच मुदतवाढ दिल्याने हा हिरा सध्या कदाचित कमी झळाळत असेल. पण मुळात तो एक अस्सल हिराच आहे. 

दर तिमाहीला तिचे व्याज व अन्य उत्पन्‍नाचे आकडे किमान 25 टक्क्यांची वाढ सतत दर्शवतात. राणांना मुदतवाढ मिळाली नाही तरी त्या जागी येणारा बँकर हा एक प्रथितयश बँकरच असेल. सचिन तेंडुलकर गेली पाच वर्षेे खेळपट्टीवर नसला तरी त्याची जागा तितक्या तोलामोलाच्या विराट कोहलीने घेतली आहे. तीच गत येस बँकेबाबत भविष्यात होऊ शकते. 
तिची 2017 व 2018 मार्च अखेरची प्रत्यक्ष व 2019 व 2020 मार्च संभाव्य आकडेवारी पुढे दिली आहे. ते उपार्जन व किं/उ गुणोत्तर सोडून कोटी रुपयात आहेत.

प्रवर्तकांकडे 20 टक्के समभाग आहेत तर विदेशी गुंतवणूक संस्था, म्युच्युअल फंडस्, बँका यांच्याकडे 25 टक्के शेअर्स आहेत. वित्तीय संस्थांकडे 43 टक्के भाग आहेत तर जनतेकडे  सुमारे 13 टक्के भाग आहेत. 
गेल्या वर्षातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 404 रुपये व 165 रुपये होते. सध्या खरेदी करणार्‍यांना पुन्हा कमाल भाव 375 रुपयांवर गेलेला दिसेल. रोज 4 कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 11.4 पट दिसते. ते जास्तीत जास्त वीसपटही होते.  खासगी क्षेत्रात ही बँक अग्रगण्य धरली जाते. त्यानंतर कोटक महिंद्रा बँक येईल. येस बँकेची तुलना एच. डी. एफ.सी. बँकेबरोबर होऊ शकेल.