Thu, Apr 25, 2019 11:22होमपेज › Arthabhan › व्हिटू रिटेल (V2 Retale) कंपनी

व्हिटू रिटेल (V2 Retale) कंपनी

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 05 2018 8:07PMया वेळचा ‘चकाकता हिरा’ म्हणून व्हिटू रिटेल (V2 Retale) कंपनीची निवड करता येईल. आता नागरी जीवन जास्त धकाधकीचे झाले असल्याने लोकांना एकाच ठिकाणी फळे, भाज्यांपासून ते मिक्सर ग्राइंडर्सपासून सर्व वस्तू मिळाल्या तर हवे असते. म्हणजे अनेक दुकानांतून वस्तू गोळा करण्याची कटकट राहत नाही. त्याद‍ृष्टीने डीमार्ट नावाने दुकाने असणारी अ‍ॅव्हेन्यू सुपरमर्टीस शॉपर्स स्टॉप व व्हिटू रिटेल या तीन कंपन्यांचा उल्‍लेख करता येईल.

त्यातील V2 Retale ही कंपनी इथे निवडली आहे. सध्या या शेअरचा भाव 440 रुपयांच्या आसपास आहे. या भावाला किं/उ गुणोत्तर 46 पट इतके मोठे दिसते. पण अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टसचे हे गुणोत्तर 130 पट आहे तर शॉपर्स स्टॉपचे 19.42 पट आहे. या दोन्हीमध्ये V2 रिटेल पडते. व्हिटू रिटेलची 2017 व 2018 मार्चची वार्षिक विक्री 472 कोटी रुपये व 560 कोटी रुपये अनुक्रमे होती. या दोन वर्षासाठी ढोबळ नफा अनुक्रमे 41.5 कोटी रुपये व 51.5 कोटी रुपये होता. करोत्तर नफा 15.7 कोटी रुपये व 31.1 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 4.8 रुपये व 9.2 रुपये होते. या दोन वर्षासाठी किं /उ गुणोत्तर अनुक्रमे 98 पट व 49 पट होते. 

मार्च 2019 ते 2021 या तीन वर्षासाठी तिची संभाव्य विक्री अनुक्र मे 820 कोटी रुपये, 1280 कोटी रुपये व 1615 कोटी रुपये व्हावी. ढोबळ नफ्याचे मार्जिन वाढणार आहे. त्यामुळे ता अंदाजे 80 कोटी रुपये, 171 कोटी रुपये व 170 कोटी रुपये व्हावा. करोत्तर नफ्याची अपेक्षा 44 कोटी रुपये, 70 कोटी रुपये व 95 कोटी रुपये आहे. त्युमळे शेअरगणिक उपार्जन अनुक्रमे 13 रुपये, 21 रुपये व 27.2 रुपये व्हावे. त्यामुळे किं./उ गुणोत्तर 34 पट, 21 पट व 16 पट असे आकर्षक होत जाईल. या शेअरमध्ये रोजची उलाढाल 50000 ते 55000 शेअर्सची होते. (डी मार्ट म्हणजेच अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टमध्ये त्याच्या साडेचार ते पाचपट उलाढाल होते) तर शोपर्स स्टॉपमधील दैनंदिन उलाढाल 25000 शेअर्स इतकी आहे.

या तिमाहीत तिने 10 नवीन दुकाने उघडली आहेत. आता तिच्या दुकानांची संख्या 63 झाली आहे. येणार्‍या नऊ महिन्यात ती आणखी 30 दुकाने उघडील व यंदा 49 दुकाने उघडण्याचा उच्चांक गाठेल. या सर्व दुकानांचे क्षेत्रफळ 10 लक्ष चौरस मीटर्स असेल. साहजिकच त्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल. जी नवीन 14 दुकाने यंदा उघडली त्यांची खानेसुमारे अशी आहे : उत्तर प्रदेश 4, ओरिसा 3, बिहार 2, झारखंड 1, तेलंगणा 1, राजस्थान 1, जम्मू अँड कश्मीर 1, व कर्नाटक 1. जून 2018 तिमाहीत तिची विक्री 187.8 कोटी रुपये झाली. ढोबळ नफा 19.9 कोटी रुपये होता व करोत्तर नफा 11.2 कोटी रुपये झाला. तिची एकूण दुकानाची संख्या गेल्या 4 वर्षांत अनुक्रमे 16, 22, 37 व 49 अशी होती. 2019 ते 2021 साली ती अनुक्रमे 99,124 व 154 असेल 2017 ते 20ची प्रत्यक्ष/संभाव्य विक्री अनुक्रमे 472 कोटी रु., 560 कोटी रु., 820 कोटी रुपये, 1275 कोटी रुपये व 1625 कोटी रुपये असेल. नक्‍त नफा प्रत्यक्ष/संभाव्य अनुक्रमे 15.7 कोटी रुपये, 31.1 कोटी रुपये, 44 कोटी रुपये, 72 कोटी रुपये व 100 कोटी रुपये आहे/दिसेल. वर्षभरात हा शेअर 600 रुपयांवर जावा. सध्या किंमत 444 रुपये आहे.