Thu, Apr 25, 2019 11:45होमपेज › Arthabhan › रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरात वाढ

Published On: Aug 06 2018 1:54AM | Last Updated: Aug 05 2018 8:15PMडॉ. वसंत पटवर्धन

गेल्या आठवड्यात बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या कौन्सिलची बैठक झाली. या ऑगस्ट सप्टेंबरच्या द्वैमासिक धोरणात बँकेने, महागाई वाढेल असे नेहमीचे  पालुपद आळवून रेपोदर पाव टक्क्याने वाढवला व तो 6.5 टक्के केला. रिझर्व्ह रेपोदर 6.25 टक्के झाला आहे. पूर्वीची पाव टक्क्याची वाढ जून 2018 च्या  पहिल्या आठवड्यात झाली होती. रेपोदर वाढण्याची अटकळ बाजाराला असल्याने, सर्वांनीच तिकडे दुर्लक्ष केले. शुक्रवारी बाजार बंद होता. निर्देशांक 37556 वर बंद झाला, तर निफ्टी 11361 पर्यंत चढला. 

गेल्या आठवड्यात हेग कंपनीचे जून 2018 तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले. कंपनीची या तिमाहीची विक्री 1595.33 कोटी रुपये झाली. करोत्तर नफा 770.33 कोटी रुपये होता. शेअरगणिक उपार्जन 192 रुपये होते. त्याचे वार्षिकीकरण केले 2018-19 वर्षासाठी 768 रुपये दिसावे. पण इतके असूनही शेअर अल्पकाळ 4450 रुपयांपर्यंत चढला व अनेकांना विक्रीची संधी मिळण्यापूर्वीच ते 4252 ते 4350 रुपयामध्ये फिरत राहिला. कंपनीचे वार्षिकीकृत उपार्जन बघितले तर किं/उ गुणोत्तर जेमतेम 5.5 पट दिसते. पण हा व ग्राफाईट इंडियाचाही शेअर सेबीच्या देखरेखीखाली असल्याने भाव पडून आहेत. पण कालांतराने सेबीही अशा शेअर्सना व्याज देईल असे वाटते. खरे पाहिले तर पुढील 9 महिन्यानेही ग्राफाईट धातूचे जागतिक भाव 12000 ते 15000 डॉलर्स (दर टनाला) असणार आहेत. त्यामुळे हेगचा नफा वाढतच राहील व वार्षिकीकृत उपार्जन जवळपास द‍ृष्टिपथात येईल. पण बाजाराला अशा शेअर्सचे, सेबीच्या धोरणामुळे वावडे असते. याच क्षेत्रातील ग्राफाईट इंडियाचे जून 2018 तिमाहीचे आकडे या आठवड्यात बुधवारी जाहीर होतील. ग्राफाईट इंडिया गेल्या शुक्रवारी1068 रुपयांपर्यंत वर जाऊन 1057 रुपयांवर बंद झाला. गेल्या बारा महिन्यांतील या शेअरचा किमान भाव 206 रुपये होता. पण त्यावेळेला त्याच्याकडे वा हेगकडे कुणाचेही लक्ष नव्हते. 

कॅपिटल फर्स्टची या तिमाहीची विक्री 1045.41 कोटी रुपये झाली. अन्य उत्पन्‍न 9.60 कोटी रुपये होते. नक्‍त नफा 101.52 कोटी रुपये झाला. शेअरगणिक उपार्जन 10.26 रुपये होते. सध्या या शेअरचा भाव 560 रुपये आहे. गेल्या वर्षातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 902 रुपये व 475 रुपये होते. सध्या रोज सुमारे 14 लक्ष शेअर्सचा व्यवहार होत आहे. सध्याच्या किंमतीला किं/उ गुणोत्तर 17.5 पट आहे. 

मराल ओव्हरसीज या वस्त्रोद्योगातील कंपनीची या तिमाहीची विक्री 176.5 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 2.69 कोटी रुपये होता. कंपनीचे भाग भांडवल 41.51 कोटी रुपये आहे. जून 2017 च्या तिमाहीसाठी कंपनीची विक्री 157.82 कोटी रुपये होती. नक्‍त नफा फक्‍त 54 लाख रुपये होता. मार्च 2018 ला संपलेल्या वर्षासाठी विक्री 640.77 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 12.35 कोटी रुपये होते व नफा फक्‍त 99 लक्ष रुपये होता. 

इंडो काऊंट इंडस्ट्रीज या आणखी एका वस्त्रोद्योग  कंपनीची या तिमाहीची विक्री 440.25 कोटी रुपये होती. नक्‍त नफा 26.80 कोटी रुपये होता. 31 मार्च 2018 ला संपलेल्या वर्षासाठी कंपनीची विक्री 1709.19 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 99.11 कोटी रुपये होते. करोत्तर नफा 131.08 कोटी रुपये होता. कंपनीचे भाग भांडवल 39.48 कोटी रुपये आहे.

ओमॅक्स ऑटो या वाहनांचे सुटे भाग बनवणार्‍या कंपनीची जून 018 तिमाहीची विक्री 277.11 कोटी रुपये होती. नक्‍त नफा फक्‍त 52 लाख रुपये होता. कंपनीचे भागभांडवल 21.89 कोटी रुपये आहे. 

के. इ. सी.  इंटरनॅशनल या कंपनीची या तिमाहीची विक्री 2104.72 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 17.53 कोटी रुपये होते. करोत्तर नफा 86.84 कोटी रुपये होता. शेअरगणि उपार्जन 3.38 रुपये होते. सध्या या शेअरचा भाव 328 रु. आहे. वर्षभरातील कमाल व किमान भाव अनुक्रमे 443 व 274 रु. आहे. सध्याच्या भावाला किं./उ गुणोत्तर 18.32  पट पडते.  पूर्वीच्या लेखात ‘चकाकता हिरा’ म्हणून या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी सुचवले होते. 

नेस्ले इंडिया या कॉफीसाठी प्रसिद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीची या तिमाहीची विक्री 2698.40 कोटी रुपयाची होती. अन्य उत्पन्‍न 60.23 कोटी रुपये होते व करोत्तर नफा 395 कोटी रुपये होता. कंपनीचे भागभांडवल 96.42 कोटी रुपये आहे. जून 2017 च्या तिमाहीसाठी कंपनीची विक्री 2484.73 कोटी रुपये होती व अन्य उत्पन्‍न 41.23 कोटी रुपयाचे होते. त्या तिमाहीसाठीचा नफा 263.43 कोटी रुपये होता. सध्या या शेअरचा भाव 10325 रु. आहे. गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे 10950 रु. व 6532 रु. होते. 

कंपनीचे व्यावहारिक वर्ष डिसेंबरला संपते. 31 डिसेंबर 2017 ला संपलेल्या वर्षासाठी एकूण विक्री 10192.18 कोटी रुपये होती. अन्य उत्पन्‍न 176.92 कोटी रुपये होते व नक्‍त नफा 1225.19 कोटी रुपये होता. वर्षभरात हा शेअर 12000 रुपयांपर्यंत जाईल. ज्यांना महाकाय कंपनीत (ङरीसश उरि) गुंतवणूक करायची असेल त्यांनी हा शेअर आपल्या भाग भांडारात जरूर ठेवावा. वर्षभरात या शेअरचा भाव 10 टक्क्यापर्यंत वाढू शकेल. 

ओ एन जी सीची या तिमाहीची विक्री 27212.83 कोटी रुपये आहे. जून 2017 तिमाहीसाठी ती 19773.54 कोटी रुपये होती. यावेळच्या तिमाहीत अन्य उत्पन्‍न 649.88 कोटी रुपये होते. हा शेअर आपल्या भागभांडारात आवश्य घ्यावा.