Sun, Apr 21, 2019 06:14होमपेज › Arthabhan › नवीन फ्ल्युओराईन

नवीन फ्ल्युओराईन

Published On: Nov 05 2018 1:28AM | Last Updated: Nov 04 2018 10:20PMया वेळचा चकाकता हिरा म्हणून ‘नवीन फ्ल्युओराईन’ (Navin Fluorine) चा उल्‍लेख आहे. स्पेशालिटी केमिकल्सचे तिचे उत्पादन आहे. या तिमाहीत त्यात 45 टक्क्याने वाढ झाली आहे. हा शेअर सध्या 630 रुपयाला मिळत आहे. वर्षभरात तो 920 रुपये व्हावा. म्हणजे 45 टक्के नफा वर्षात अपेक्षित आहे. इनऑर्गेनिक प्लुओराईडनचा तिचा व्यवसाय वाढतच राहील. 241 कोटी रुपयांची तिची सप्टेंबर 2018 तिमाहीची विक्री आहे. तिच्या उत्पादनातील निर्यातही वाढत आहे. सप्टेंबर 2017 च्या तिमाहीपेक्षा सप्टेंबर 2018 च्या तिमाहीत ती 110 टक्क्याने वाढली होती. भारतातील विक्रीत 40 टक्के वाढ होती. कंपनी औषधी क्षेत्रात आपले योगदान वाढवीत आहे. वैशिष्ट्यपूर्ण कृषी रसायनातही तिची विक्री वाढत आहे. या तिमाहीत नफा जरी कमी झाला असला तरी पिरामल समूहाबरोबर असलेल्या तिच्या दहेजमधील कारखान्यात चांगले उत्पादन होत आहे. कंपनीची 2017 व 2018 मार्चची प्रत्यक्ष व 2019 व 2020 ची संभाव्य आकडेवारी खाली दिली आहे. (कोटी रुपयांत)

यावेळच्या तिमाहीत कंपनीची विक्री 242 कोटी रुपये होती. ढोबळ नफा 50 कोटी रुपये होता. तो विक्रीच्या 21 टक्के आहे. नक्‍त नफा 34.2 कोटी रुपये आहे. वरील आकडे पिरामल समूहाबरोबर असलेल्या संयुक्‍त प्रकल्पाव्यतिरिक्‍त आहेत. स्पेरॉलिटी केमिकल्सप्रमाणेच रेफ्रिजरंटस क्षेत्रातही तिचे उत्पादन आहे. स्पेशॅलिटी केमिकल्सखेरीज इन ऑरगॅनिक फ्ल्युओराईडस्मध्ये तिचे उत्पन्न 31 टक्क्याने वाढले आहे. 

2020 मार्च वर्षासाठी तिची संभाव्य विक्री 1140.8 कोटी रुपये अपेक्षित आहे. ढोबळ नफा 280 कोटी रुपये व्हावा. नक्‍त नफा 206 कोटी रु. व्हावा व शेअरगणिक उपार्जन 43 रुपयांच्या आसपास व्हावे. कॉन्ट्रॅक्स रिसर्च (CRAMS) मध्ये तिचे खूप मोठे योगदान आहे. कंपनीचे भागभांडवल फक्‍त 9.9 कोटी रुपये आहे. गंगाजळी 1300 कोटी आहे. कंपनीने आपली कर्जे कमी करत ती फक्‍त 38 कोटी रुपयांवर आणली आहेत. कंपनीने संयुक्‍त प्रकल्पात 500 कोटी रुपये गुंतवले आहेत. कंपनीच्या शेअरची पुस्तकी किंमत सध्या 200  रु. आहे.