Mon, May 25, 2020 23:24होमपेज › Arthabhan › लक्ष्मीची पावले : बँकिंग क्षेत्रात गुंतवणुकीला संधी

लक्ष्मीची पावले : बँकिंग क्षेत्रात गुंतवणुकीला संधी

Last Updated: Oct 21 2019 1:30AM
डॉ. वसंत पटवर्धन

अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार सुखावले आहेत. समभागांच्या गुंतवणुकीवरील कर जगातील अन्य देशांच्या तुलनेत समान असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये वक्तव्य केले आहे. बर्‍याच उद्योगात परदेशी गुंतवणुकीला 100 टक्के परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचा तिसरा दौरा केला. 2014 व 2016 नंतर तीन वर्षांनी पंतप्रधानांचा हा तिसरा दौरा  होता. अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ह्यूस्टन येथे “हाऊडी मोदी” या नावाने हा कार्यक्रम गाजला. ह्यूस्टनची लोकसंख्या 75000 आहे. मोदींच्या भाषणाला 50000 अनिवासी अमेरिकन इंडियन्स व अमेरिकन नागरिक उपस्थित होते. संयोजकांनी कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि कौशल्याने आखला होता. रिवाजाप्रमाणे अन्य देशांचे प्रमुख वॉशिंग्टन (कोलंबिया) मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना भेटायला जातात.

पण, जागतिक नेत्यांमध्ये मोदींची प्रतिमा आता इतकी उंचावली आहे की तिथे रितीरिवाज कोलमडून पडतात. त्यामुळे वॉशिंग्टनला मोदी जाण्याऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच मोदींना भेटायला टेक्सासला आले. (पाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख इम्रान खान हेही काही आठवड्यापूर्वी अमेरिकेत गेले होते. पण त्यांना ट्रम्प यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्क वॉशिंग्टनला जावे लागले होते. मोदी बरोबरच्या भेटीत ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा मित्र मी ट्रम्प आहे, असे विधान केले. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. या भेटीनंतर ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेत आपले स्थान पक्के केले आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा राष्ट्राध्यक्ष होण्याची आपली वर्णी लावून घेतली आहे.

नेहमीप्रमाणे भारत-अमेरिका व्यापार वाढवण्यासाठी दोन्ही नेत्यात बोलणी झाली. भारताने अमेरिकेतून बर्‍याच वस्तू आयात करण्याचे मान्य  केले. तर भारतीय वस्तू अमेरिकेत आणण्यासाठी अमेरिकेने तयारी दर्शवली. भारत आता 5 ट्रिलीयन डॉलरच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि तो जगातील चौथा मोठा देश म्हणून यापुढे ओळखला जाणार आहे.

दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात सध्या सतत अयोध्या-रामजन्मभूमी/बाबरी मशीद याबद्दल रोज सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 28 दिवस सुनावणी चालू राहिली नसून सर्वोच्च न्यायमूर्ती श्री. रंजन गोगोई हे नोव्हेंबरअखेर निवृत्त होणार असल्यामुळे त्यापूर्वीच फैसला सुनावला जाईल, असा अंदाज आहे. मुस्लिम वक्फ बोर्डाने अयोध्येत राम जन्मल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे अयोध्यात राम मंदिरही बांधले जाईल व जवळच बाबरी मशिदही पुन्हा उभारली जाईल, अशी समाधानकारक तडजोड निघण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या मस्तकावर आणखी एक शिरपेच लावला जाईल.

370 कलम रद्द करून भारताने पाकिस्तानला एक टोला लावला आहे. आता बोलणी फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच होतील, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.

 अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट कर 30 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर आणल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार सुखावले आहेत. समभागांच्या गुंतवणुकीवरील कर जगातील अन्य देशांच्या तुलनेत समान असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये वक्तव्य केले आहे. बर्‍याच उद्योगात परदेशी गुंतवणुकीला 100 टक्के परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा आहे.

गेल्या गुरुवारी सप्टेंबर महिन्यासाठीचा वायदेबाजार बंद होताना निप्टी 5.69 टक्के वाढून बंद झाला. बँक निफ्टी तर 9.86 टक्क्यांनी वर चढला. रिलायन्स आणि आय सी आय सी आय बँक, तसेच धातूंचे शेअर्सही खूप वाढले. शुक्रवारी निर्देशांक 38990 वर बंद झाला. निफ्टी 11571 वर स्थिरावला, तर बँक निफ्टी 30,003 पर्यंत चढेल. सोन्यानेही 37611 चा उच्चांक गाठला. चांदी 46785 पर्यंत (किलो) चढली होती. रुपया डॉलरचा विनियमन दर एका डॉलरला 70.91 रुपये होता. गोदरेज प्रॉपर्टीज, बी इ एम एल व हिंदुस्थान पेट्रोलियम हे शेअर्स चांगले वाढले. एच डी एफ सी बँक, एच डी एफ सी, आणि आय सी आय सी आय बँकेत मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. बाजारामध्ये 977 शेअर्स वर चढले. 782 शेअर्स उतरले, तर 368 शेअर्समध्ये काहीच बदल झालेला नव्हता.

कॉर्पोरेट कर कमी झाल्यानंतर आता  ऑक्टोबरपासूनच्या दुसर्‍या सहामाहीमध्ये कंपन्यांचा नफा वाढेल. बँकांची अनार्जित कर्जे कमी होतील. कॉर्पोरेट कर कमी झाल्याचा फायदा कोटक महिंद्र बँक, आय आय बी, एच डी एफ सी बँक यांना होईल. सरकार पुढील काही महिन्यात राष्ट्रीयीकृत बँकात भांडवल घालणार आहे.स्टेट बँकेने मात्र आपल्याला जादा भांडवलची जरूरी नाही, असे जाहीर केले आहे.

मिश्र धातू निगम (मिधानि) नजीकच्या भविष्यात चांगली वाढेल. 1 सप्टेंबर 2019 ला तिच्याकडे 1815 कोटी रुपयांच्या ऑडर्स आहेत. वाहन कंपन्यात मात्र बरीच मंदी आली आहे. मारुती सुझुकी आणि अन्य वाहन कंपन्या आपले उत्पादन थोडे कमी करतील. मिधानिमध्ये अल्प प्रमाणात गुंतवणूक करायला हरकत नाही.

अर्थकारणावरून पुन्हा राजकारणावर नजर टाकायची म्हटले तर, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची 21 ऑक्टोबरला निवडणूक आहे. या एकाच दिवशी राज्यात सर्वत्र निवडणुका होतील व 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. महाराष्ट्रात परत महायुतीचेच सरकार येईल, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. गेल्या गुरुवारी रात्री शिवसेनेला 108 ते 110 जागा दिल्या जातील. भाजप 145 ते 150 जागा लढवेल आणि अन्य मित्र पक्षांना उरलेल्या जागा दिल्या जातील, असे म्हटले आहे. 

गुंतवणुकीसाठी सध्या आयटीसीचाही विचार करता येईल. सध्या हा शेअर 250 रुपयांच्या आसपास आहे. वर्षभरातील त्याचा उच्चाकी भाव 310 रुपये होता, तर नीचांकी भाव 234 रुपये होता. सध्याच्या भावाला किं/ऊ गुणोत्तर 23.76 पट आहे. रोज सुमारे पावणे दोन कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. कंपनीचे पूर्वीचे पावणे दोन कोटी शेअर्सचा व्यवहार होतो. कंपनीचे पूर्वीचे पूर्ण नाव इंपिरिअल टोबॅको कंपनी असे होते. वर्षभरात शेअर 30 टक्क्याने वर जावा.