Sun, Dec 08, 2019 06:33होमपेज › Arthabhan › चकाकता हिरा : GHCL (गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड)

चकाकता हिरा : GHCL (गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड)

Published On: Aug 05 2019 1:30AM | Last Updated: Aug 05 2019 1:30AM
यावेळचा चकाकता हिरा म्हणून ॠकउङ चा (गुजराथ हेवी केमिकल्स लिमिटेड) परामर्ष घेतला आहे. कंपनीचे सोडा अ‍ॅशचे उत्पादन आहे. जरुरीपेक्षा तिची उत्पादन क्षमता जास्त आहे (ओव्हर  कपॅसिटी) तिचे उत्पादन वाहनक्षेत्राशी संबंधित असल्यामुळे सध्या तिला मंदीचा चटका जाणवत असला, तरी येत्या वर्षात तिची विक्रीची क्षमता वाढती राहील. सध्या हा शेअर 205 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. वर्षभरात त्यात 40 टक्के तरी वाढ होऊन तो 295ते 300 रुपये व्हावा. दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला आहे. इन ऑरगॅनिक केमिकल्स क्षेत्रातील तिच्या उत्पादनाबरोबरच तिचा ‘होम टेक्स्टाईल्स’चा विभाग तिच्या विक्रीत भर घालतो. जून तिमाहीसाठी तिच्या ढोबळ नफ्यात 25 टक्क्यांनी वाढ झाली होती. नक्त नफा गेल्या जूनपेक्षा 68 टक्क्यांनी जास्त आहे. सध्याचे शेअरचे किं/उ गुणोत्तर 6॥  पट इतके आकर्षक आहे. तिचे उत्पादन डीटर्जंटमध्येही वापरले जाते. 

कंपनीच्या जून 2019 च्या तिमाहीची विक्री 876 कोटी रुपये होती. ढोबळ नफा 218 कोटी रुपये होता आणि नक्त नफा 103.5 कोटी रुपये होता. जून 2019 च्या तिमाहीसाठी तिची असेंद्रिय रसायनाची विक्री 1570 कोटी रुपये होती. भाग भांडवलात वैविध्य असावे म्हणून बजाज फायनान्स, येस बँक, स्टरलाईट टेक्नॉलॉजी आणि ॠकउङ यांची निवड केली आहे. 

गुजराथमधील नामांकित कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. कंपनीला सध्या चीनमधल्या आयातीची मोठी स्पर्धा आहे; पण भारतातील सोडा अ‍ॅशची मागणी वाढत आहे. भारतात सोडा अ‍ॅश सध्या तुर्कस्थानमधून येत आहे.