Sat, Sep 21, 2019 05:52होमपेज › Ankur › अजब-गजब : करा मी वंदिले

अजब-गजब : करा मी वंदिले

Published On: Jun 08 2019 1:54AM | Last Updated: Jun 08 2019 1:54AM
एखाद्या देशाचे उत्पन्‍न वाढविण्यासाठी सरकार कशावर कर लावेल सांगता येत नाही. 17 व्या शतकात इंग्लंडने घरातील खिडक्या व शेकशेगड्यांवर कर लावला होता. मिठावरील अवास्तव करामुळे फ्रेंच क्रांती व भारतीय स्वातंत्र्य चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्राचीन इजिप्‍तमध्ये सर्वात जास्त कर स्वयंपाकाचे तेल खरेदी करताना भरावा लागे. पहिल्या शतकात रोमन सम्राट वास्पुसिअसने चक्‍क सार्वजनिक मूत्रालयांवर कर लावला होता. रशियन लोकांच्या दाढी न करण्याच्या सवयीला वैतागून रशियाचा सम्राट पिटर द ग्रेटने वाढलेल्या दाढीवरच कर लावला होता.

आयर्लंड, डेन्मार्क व इतर काही युरोपिअन देश सध्या गायींच्या मलमूत्रावर कर आकारत असून गायीच्या मालकांना तो भरावा लागतो. कॅनडात लहान मुलांसाठी बनवण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांसह मुलांना खेळणी मोफत असतील तर कर द्यावा लागत नाही. नाहीतर कर भरावा लागतो. स्विडनमधील कर तर सर्वात विचित्र आहे. येथे जर तुम्ही तुमच्या मुलाचे अथवा मुलीचे असे नाव ठेवले जे अद्याप कोणी ठेवले नसेल तर कर भरावा लागतो.