पिंकी व पूजाश्री गोगोई | पुढारी 
Wed, Aug 22, 2018 08:12होमपेज › Ankur › पिंकी व पूजाश्री गोगोई

पिंकी व पूजाश्री गोगोई

Published On: Feb 10 2018 1:26AM | Last Updated: Feb 09 2018 8:57PMपावसाळा म्हटला की आसाममध्ये केव्हा ना केव्हा पूरस्थिती हमखास उद्भवते. 10 जुलै 2017 रोजी आसाममधील लखिमपूर जिल्ह्यातील हाटिलुंग गावाला पुराच्या पाण्याने वेढले होते. शेजारच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील धरणाचे पाणी या गावात घुसले होते. सुमारे तीस लोक आपापल्या घरांच्या छतांवर चढून काही मदत मिळते का ते पाहत होते. त्यांच्या मदतीला देवासारख्या धावून आल्या पिंकी व पूजाश्री गोगोई या दोन बहिणी. या दोन लहान मुलींनी केळीच्या खोडापासून बनविलेल्या कामचलाऊ तराफ्याच्या मदतीने आपत्तीत सापडलेल्या त्या तीस लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचविले. या तीस जणांमध्ये बहुतांश स्त्रिया व लहान मुले होती. सरकारी मदतीची वाट न पाहता या दोन लहान मुलींनी जे धाडस दाखविले त्यामुळे तीस जणांचा जीव वाचला. आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पिंकी व पूजाश्रीची शिफारस राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी केली आहे.