Mon, Nov 20, 2017 17:19होमपेज › Ankur › कर्नाटकचा राज्यपक्षी : नीलपंख

कर्नाटकचा राज्यपक्षी : नीलपंख

Published On: Nov 13 2017 9:12PM | Last Updated: Nov 13 2017 9:11PM

बुकमार्क करा

गौरव दिवाण

१. मराठी नाव : नीलपंख,चाष

२. Common Name : Indian roller(इंडियन रोलर)

३. Zoological Name/Scientific Name: कोरेशियस बेन्गालेन्सिस

४. Local Name : Neelkanth

नीलपंख हा कर्नाटकबरोबरच आंध्रपअदेश, ओडिसा या राज्यांचाही राज्यपक्षी आहे.

नीलपंख पक्षी नीळसर हिरव्या रंगाचा असतो. त्याच्या छातीजवळ तपकीरी रंग असतो. त्याची चोच काळ्या रंगाची असते.  नीळे आणि हिरवे पंख हे या पक्ष्याची खरी ओळख आहेत. नीलपंख नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. या पक्ष्याची लांबी २५ ते ३५ सेंटीमीटर असते. या पक्ष्याचा आवाज कर्णकर्कश आहे. 

नीलपंख पक्षी काजू, फळांच्या बीया, धान्य, कीटक असे सर्वप्रकारचे अन्न खातो. लहान सरपटणारे प्राणी(लहान साप), गोगलगाय, उभयचर, फुलपाखरे, पतंग यांसारखे किटकही हा पक्षी खातो. बेडूकसुदधा अन्न म्हणून हा पक्षी खातो.

नीलंपख पक्षी काटक्या, पाने, मुळे, गवत यापासून घरटे बनवतात. मार्च ते जुलैच्या दरम्यान नीलपंख अंडी घालतो.  पांढरट रंगाची गोलाकार अंडी असतात. १६ ते २१ दिवसांत हा पक्षी अंडी उबवतो. नर आणि मादी दोन्ही पक्षी अंडी उबवण्याचे काम करतात. या काळात नरपक्षी मादीसाठी अन्न गोळा करतो.  लहान पिले दोन आठवड्यांनतर स्वत: अन्न खायला सुरूवात करतात. लहान पक्षी दोन महिन्यांपर्यत मोठ्या पक्ष्यांबरोबर राहतात. नीलपंख पक्ष्याचे आयुष्य १८ वर्षांचे असते.

नीलपंख पक्षी पानगळी वनात आढळतो. तसेच तो शेताजवळील विजेच्या तारांवर, केबल तारांवर, गवताळ प्रदेशात आणि जंगलात आढळतो. हा पक्षी कर्नाटकबरोबरच हिमालय, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमारसह इतर देशातही आढळतो.