होमपेज › Ankur › अजब गजब : जिवंत गोळा

अजब गजब : जिवंत गोळा

Published On: Jun 09 2018 1:39AM | Last Updated: Jun 08 2018 8:42PM26  मे 1974 रोजी अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात राहणार्‍या टेरी बेटझ् या तरुणाला जवळच्याच जंगलात मिश्रधातूने बनवलेला एक चकचकीत गोळा सापडला. आठ इंच परिघाचा हा गोळा घेऊन तो घरी आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा सामान्य गोळा नाही. याचे कारण गोळ्याजवळ एखादे वाद्य वाजवताच गोळ्यातून विचित्र ध्वनी येऊ लागला. एखाद्याने गोळा जमिनीवर दूर फेकला तरी तो फेकणार्‍याकडे परत येऊ लागला. हा चमत्कारिक गोळा जेव्हा अमेरिकन सैन्याच्या प्रयोगशाळेने तपासला तेव्हा त्यांना आढळले गोळा मॅग्‍नेटिक फेरस मिश्रधातू क्रमांक  431 ने बनला आहे. 7.96 इंच परिघाच्या व 10 किलो वजनाच्या या गोळ्याचे कवच अर्धा इंच जाडीचे आहे. जे 120000 प्रतिचौरस इंचांचा दाब सहन करू शकते. गोळा आतून पोकळ असला तरी त्याच्या आत दोन गोलाकार पदार्थ आहेत, जी यंत्रे असावीत. गोळ्यात चार चुंबकीय ध्रुव असल्याचेही आढळले. मात्र हा गोळा कुठून आला व कोणी कशासाठी बनवला ते गुलदस्त्यातच राहिले.