Tue, Jul 23, 2019 19:30होमपेज › Ankur › कथा :  गर्विष्ठ चिलट

कथा :  गर्विष्ठ चिलट

Published On: May 11 2019 2:03AM | Last Updated: May 11 2019 2:03AM
कोणे एकेकाळी एका जंगलात कंटक वृक्षाखाली असलेल्या एका झुडपात एक चिलट राहत होते. त्या वृक्षाजवळच्या गुहेत जंगलाचा राजा सिंह राहत असे. चिलटाला सिंह वेळी-अवेळी करत असलेल्या गर्जनेचा फार त्रास होई. एकदा मध्यरात्री सिंह डरकाळ्या फोडायला लागला त्यामुळे चिलटाची झोपमोड झाली. रागावलेल्या चिलटाने गुहेत जाऊन सिंहाच्या नाकाचाच चावा घेतला. सिंहाने हाताच्या पंज्याने चिलटाला मारण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ!

चिलटाने सिंहाचा पंज्याचा वार चुकवला व पुन्हा एकदा त्याच्या नाकाचा चावा घेतला. वैतागलेला सिंह चिलटासमोर हार मानून गुहेच्या अंतर्भागात पळून गेला. 

सिंहाला पळून जाताना पाहून चिलटाला आपल्या शौर्याचा गर्व चढला. विजयाच्या धुंदीत कंटक वृक्षाकडे परतताना त्याला रस्त्यात असणारे कोळ्याचे जाळे दिसले नाही. त्या जाळ्यात चिलट अडकले व कोळ्याकडून तत्काळ मारले गेले.

तात्पर्य : बलशाली शत्रूपेक्षा कमजोर शत्रूपासून नेहमीच सावध रहावे.

(इसाप कथा)