Thu, Nov 14, 2019 07:12होमपेज › Ankur › ज्ञानात भर : जागतिक चिमणी दिवस

ज्ञानात भर : जागतिक चिमणी दिवस

Published On: Jul 06 2019 1:29AM | Last Updated: Jul 05 2019 8:14PM
चिमणी हा अतिशय छोटा पक्षी असला तरी सुमारे 25 उपप्रजाती असलेल्या व जगभर पसरलेल्या या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आहे. दहा हजार वर्षांपासून माणसांच्या घरात व अंगणात बागडणार्‍या या पक्ष्याला धोका आहे तो जागतिक उष्मावाढ, वायू व जलप्रदूषण आणि कीटकनाशकांच्या अतिवापरापासून. पृथ्वीच्या पर्यावरण आरोग्याची पातळी या पक्ष्यांच्या संख्येवरून कळते. दुर्दैवाने जगभरात विशेषत: शहरी भागात चिमण्यांची संख्या वेगाने घटत आहे. युरोपातील औद्योगिक क्रांती, चीनमधील माओ काळात सुरू झालेला रासायनिक कीटकनाशकांचा वापर यामुळे या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आले.

आता विकसनशील व अविकसित देशांतही चिमण्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस घोषित करण्यामागे या पक्ष्याला पृथ्वीतलावरून कायमचे नष्ट होण्यापासून वाचविणे हाच उद्देश आहे.